AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ विहिरीत गेलेला कधीच परतला नाही, गूढ रहस्य जाणून घ्या

ही एका भयावह विहिरीची स्टोरी आहे. फ्रान्समधील टोनरी गावात वसलेली फॉसे डायन विहीर शतकानुशतके गूढ आणि आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. त्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक लोक विहिरीच्या आत गेले, पण परत आलेच नाहीत.

‘या’ विहिरीत गेलेला कधीच परतला नाही, गूढ रहस्य जाणून घ्या
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Apr 29, 2025 | 1:51 PM

तुम्हाला माहिती आहे की, अनेक ठिकाणी असे काही वेगवेगळे रहस्य असतात की आपल्याला देखील कळत नाही. अनेक ठिकाणी पाणी कुठू येते हेच कळत नाही, तर कुठे निसर्गाची किमया बघायला मिळते. तर काही ठिकाणी इतकं नितळ पाणी दिसतं की बघून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विहिरीबद्दल माहिती सांगणार आहोत.

ही विहिर इतकी घातक आहे की एकदा या विहिरीत गेलेला माणून पुन्हा परतत नाही. हो. हे सत्य असून या विहिरीचे रहस्य अजूनही उलगडले नाही. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

फ्रान्समधील टोनेरी या गावात एक गूढ विहीर आहे. ही विहीर शतकानुशतके सातत्याने पाण्याने भरलेली आहे. या विहिरीचे नाव फॉसे डायन आहे, ज्याचा अर्थ फ्रेंचमध्ये ‘पवित्र खड्डा’ असा होतो. लोक त्याला पवित्र मानण्याचे देखील एक कारण आहे. ही प्राचीन विहीर गेली अनेक शतके गूढ आणि आकर्षणाचे केंद्र राहिली आहे.

असे म्हटले जाते की, धबधब्यातून सतत पाणी वाहत असे. अठराव्या शतकात फ्रेंचांनी त्याभोवती भिंत उभी करून त्याला विहिरीचे स्वरूप दिले. मात्र, शतकानुशतके या विहिरीखाली काय आहे, याबाबत लोकांच्या मनात कुतूहल आहे. आख्यायिका म्हणतात की हे दुसऱ्या जगाचे प्रवेशद्वार असू शकते किंवा त्याच्या आत लपलेला एक भयानक प्राणी असू शकतो.

1908 मध्ये पहिल्यांदा त्यात डुबकी मारण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यावेळी उपकरणांच्या कमतरतेमुळे पाणबुडे जास्त खोलात जाऊ शकले नाहीत, असे म्हटले जाते. 1955 आणि 1962 मधील प्रयत्नही अयशस्वी ठरले.

1963 मध्ये आणखी एका पथकाने खोल वर उतरण्याचा प्रयत्न केला, पण दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर 1974 मध्ये दोन प्रोफेशनल डायव्हर्स आत गेले आणि परत आलेच नाहीत. त्यांचे मृतदेह सापडले नाहीत. 1996 मध्ये आणखी एकाच्या मृत्यूनंतर या गूढ विहिरीत डायव्हिंगवर 20 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

2019 मध्ये प्रथमच पियरे-एरिक डेझॅन या अनुभवी डायव्हरने विहिरीच्या आत 370 मीटरचे अंतर पार केले, परंतु तो देखील या धबधब्याच्या उगमस्थानापर्यंत पोहोचू शकला नाही.

फॉसे डायनच्या जलस्त्रोताचे गूढ अद्याप सुटलेले नाही. त्याचे भूमिगत भुलभुलैयासारखे बोगदे, ज्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, आजही नकाशावर अपूर्ण आहेत.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.