Chimpanzee : धावत जाऊन चिंपांझीनं महिलेला मिठी मारली, Viral Video पाहून यूझर्स भावुक

सोशल मीडियावर दररोज प्राण्यां(Animals)शी संबंधित काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. जर आपण वन्यजीवां(Wildlife)बद्दल बोललो, तर सोशल मीडिया यूझर्सना चिंपांझी(Chimpanzee)शी संबंधित व्हिडिओ मोठ्या आवडीनं पाहायला आवडतं. यामुळेच चिंपांझीशी संबंधित कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, की तो लगेच व्हायरल होतो.

Chimpanzee : धावत जाऊन चिंपांझीनं महिलेला मिठी मारली, Viral Video पाहून यूझर्स भावुक
महिलेला मिठी मारताना चिंपांझी
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 8:01 AM

Chimpanzee cute video : सोशल मीडियावर दररोज प्राण्यां(Animals)शी संबंधित काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. जर आपण वन्यजीवां(Wildlife)बद्दल बोललो, तर सोशल मीडिया यूझर्सना चिंपांझी(Chimpanzee)शी संबंधित व्हिडिओ मोठ्या आवडीनं पाहायला आवडतं. कारण ते माणसांप्रमाणेच वागत असतात. यामुळेच चिंपांझीशी संबंधित कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, की तो लगेच व्हायरल होतो. सध्या चिंपांझीचा एक अतिशय छानसा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल, की प्राण्यांनाही माणसासारख्याच भावना असतात. व्हिडिओमध्ये, जेव्हा एक चिंपांझी एका परिचयातल्या महिलेला बऱ्याच काळानंतर भेटतो तेव्हा ती तिला मिठी मारतो. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूझर्सना आवडला आहे आणि अनेकजण तो शेअरही करत आहेत.

महिलेजवळ जातो धावत

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की दोन लोकांनी एका चिंपांझीला पकडून ठेवलं आहे. जेव्हा त्यांनी चिंपांझीला सोडलं तेव्हा तो पटकन् एका महिलेजवळ धावत जातो आणि तिला मिठी मारतो. हे दृश्य पाहून अनेक यूझर्स भावुक झाले. हा चिंपांझी या महिलेला ओळखत होता. बराच वेळ दूर राहिल्यानंतर तो महिलेला भेटला नव्हता. आता तिला पाहिल्यानंतर तो धावत जाऊन तिला मिठी मारतो.

इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर शेअर

एका चिंपांझी आणि एका महिलेचा हा अतिशय छान व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर safarigallery नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘दिल को छू लेने वाला मिलन!’ यासोबतच अॅडमिननं अशी माहिती दिली आहे, की चिंपांझीला ASL (अमेरिकन सांकेतिक भाषा)सारख्या मानवी भाषा शिकवल्या जाऊ शकतात. वाशो नावाच्या मादी चिंपांझीला 240हून अधिक सांकेतिक भाषा माहीत होत्या.

12 हजारांहून अधिक लाइक

एका दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या या व्हिडिओला 12 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हे निखळ प्रेम वाटलं, तर काहीजण ते पाहून भावुक झाले. लोक म्हणतात की चिंपांझीला मिठी मारताना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

Video Viral : अंडी वाचवण्यासाठी कोंबडीनं घेतला ‘कोब्रा’शी पंगा; आपल्या चोचीनं केला हल्ला, अखेर…

Kids Video : ‘हा’ चिमुरडा शिडीवरून असा काही उतरतो… यूझर्स म्हणतायत, याला ऑलिम्पिकच्या तयारीला पाठवा

Dog Video : जोरदार लाटांमध्ये बुडत होता कुत्रा मग जीव धोक्यात घालत होमगार्डनं पाण्यात घेतली उडी, आणि…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.