Kacha Badamवर Dance करणारी किती गोड आहे ही चिमुरडी! Viral झालेला ‘हा’ Video पुन्हा पुन्हा पाहाल

सोशल मीडियाच्या दुनियेत सध्या एका गाण्याची प्रचंड क्रेझ आहे, ती म्हणजे कच्चा बदाम (Kacha Badam). अलीकडेच एका बाप-लेकीनं या गाण्यावर अशा डान्स (Dance) स्टेप्स दाखवल्या, की लोक त्यांचे वेडे झाले आहेत. डान्स करताना ही मुलगी इतकी सुंदर दिसत आहे, की हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायला आवडेल.

Kacha Badamवर Dance करणारी किती गोड आहे ही चिमुरडी! Viral झालेला 'हा' Video पुन्हा पुन्हा पाहाल
कच्चा बदाम गाण्यावर डान्स करताना बाप-लेकीची जोडी
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 5:02 PM

Kacha Badam song reel : सोशल मीडियाच्या दुनियेत सध्या एका गाण्याची प्रचंड क्रेझ आहे, ती म्हणजे कच्चा बदाम (Kacha Badam)… काय खास आहे या गाण्यात? प्रत्येकजण या गाण्यावर इन्स्टाग्राम रील बनवताना दिसत आहे. गंमत म्हणजे हे गाणं कोणत्याही प्रसिद्ध गायकानं गायलेलं नसून भुबन बद्याकर (Bhuban Badyakar) नावाच्या एका रस्त्यावरच्या विक्रेत्यानं गायलं आहे, जो मूळचा पश्चिम बंगालमधल्या बीरभूम जिल्ह्यातला आहे. अलीकडेच एका बाप-लेकीनं या गाण्यावर अशा डान्स (Dance) स्टेप्स दाखवल्या, की लोक त्यांचे वेडे झाले आहेत. डान्स करताना ही मुलगी इतकी सुंदर दिसत आहे, की तिच्यासाठी हा व्हिडिओ एकदा नाही तर पुन्हा पुन्हा बघायला आवडेल. ‘कच्चा बदाम’ गाण्यावर बाप-लेकीचा नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर

भुबन बद्याकरचं हे गाणं केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या लोकांना खूप आवडलं. आता परदेशातल्या एका बाप-मुलीच्या जोडीनं या गाण्यावर आपल्या धमाल नृत्यानं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. पाब्लो आणि वेरोनिकानं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट pabloeveronica01वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघंही ‘काचा बदाम’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यूझरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की लव्ह इंडियन ट्रेंड. एका दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला 78 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

जिंकली नेटकऱ्यांची मनं

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही वडील आणि मुलगी वॉशरूममध्ये आरशासमोर उभं राहून ‘कच्चा बदाम’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहू शकता. या दोघांना पाहून तुम्हाला ते इतर कोणत्याही देशातले आहेत असं वाटणार नाही. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींना ही पिता-पुत्रीची जोडी खूप मजबूत वाटते, तर काहींना तुम्ही आमची मनं जिंकलीत, असं म्हणतात. या परदेशी बाप-लेकीच्या जोडीचे अनेक भारतीय चाहते आहेत. भारतीयही या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

तेव्हा कळलं व्हिडिओ व्हायरल झालाय म्हणून…

हातगाडीवर वस्तू विकणारा भुबन खूप दिवसांपासून कच्चा बदाम गात आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इंटरनेटवर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण रातोरात ते इंटरनेट सेन्सेशन बनले आहेत, हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांचं गाणं ऐकून सगळ्यांनाच आनंद झालाय. भुबन सांगतात, की एकदा एक व्यक्ती आपल्याकडे आला आणि त्यानं गाण्याचं कौतुक केलं, तेव्हा त्यांना कळलं, की आपला एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

#AtharvaTheOrigin : धोनीच्या ‘सुपरहिरो’ अवतारानं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस!

आई आणि मुलीच्या रंगलेल्या स्पर्धेत चिमुकलीला काय मिळतं गिफ्ट? धमाल उडवणारा Video Viral

…आणि पेट्रोलपंपावर ग्राहकाला ‘असा’ लावला चुना, तुमच्यासोबत तर असं घडत नाही ना? Funny Video Viral

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....