Viral Video: अरे ढूँढ़ने से तो खुदा भी मिल जाए, ख़ुशी क्या चीज है… ! व्हिडीओ बघा, खुश राहायचं शिका

आता हा व्हिडीओ शेअर केलाय एका आयएएस अधिकाऱ्याने. त्याला सुद्धा या व्हिडीओने प्रेमात पाडलंय. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं, त्या दोघांचा आनंद पाहून असं वाटतं की, जणू काही त्याने

Viral Video: अरे ढूँढ़ने से तो खुदा भी मिल जाए, ख़ुशी क्या चीज है... ! व्हिडीओ बघा, खुश राहायचं शिका
व्हिडीओ बघा, खुश राहायचं शिकाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 1:36 PM

आनंद हा मिळत नसतो तो शोधावा लागतो. कुठलीही गोष्ट असो, लहान मोठी, महाग स्वस्त, साधी, नवी, सेकंड हॅन्ड आपल्याला त्यात आनंद शोधता यायला हवा. अशा गोष्टी लहानपणापासून मुलांना शिकवल्या जातात. असं म्हणतात कि लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात. खुश (Happy) राहायचं हे सांगण्यापेक्षा ते दाखवून द्यायला हवं आणि लहानपणीच ते दाखवलं गेलं तर उत्तम! असाच एक व्हिडिओ वायरल होतोय ज्यात एक माणूस सेकंड हॅन्ड सायकल विकत घेऊन घरी येतोय. तो आल्या आल्या त्याची मुलगी ती मुलगी खूप खुश होते आणि आनंदात ती नाचते (Dancing), उड्या मारते. आधीपासून आपल्या भारतात एक परंपरा आहे ज्यात आपण नवीन वस्तू किंवा नवीन काहीही आणलं कि आधी त्याची पूजा करतो. आता हळूहळू हे सगळं नजरेस पडणं कमी झालंय खरं पण या वायरल व्हिडिओत (Viral Video) ते ही दिसतं. त्या नवीन सायकलला मस्त हार लावून त्याची छान पूजा केली जातीये. मुलगी आणि बाप दोघंही खूप सुखी आणि समाधानी दिसतायत.

काय आहे व्हिडीओमध्ये

व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. व्हिडीओमध्ये एक बाप स्वत:साठी जुनी सायकल खरेदी करून घरी घेऊन येतो. हे पाहून त्याची मुलगी इतकी सुखावते, जणू काही तिच्या वडिलांनी महागडी गाडी विकत घेतलीये. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, ही व्यक्ती आपल्या घराबाहेर सायकल पार्क करत आहे. हीच सायकल त्याने स्वत:साठी विकत घेतली. सगळ्यात लक्षवेधी काय असेल तर ही सायकल नवी सुद्धा नाही, तर जुनी आहे, सेकंड हॅन्ड आहे. आत्ता वन प्लस सारखे नवे मोबाईल फोन घेऊन सुद्धा खुश न होणारे असमाधानी आपण आणि हे सेकंड हॅन्ड सायकल घेऊन सुद्धा खुश होणारे बाप लेक आपल्याला या व्हिडिओतून बरंच काही शिकवून जातात. माणूस या सायकलचे हार घालून स्वागत करतो आणि त्याची पूजाही करताना दिसतो. सायकलवर नजर टाकली तर ती खूप जुनी दिसते. त्याचबरोबर त्याची मुलगीही हात जोडून उभी असते हा व्हिडीओ तुम्हालाही नक्की आवडेल.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ शेअर केलाय एका आयएएस अधिकाऱ्याने

आता हा व्हिडीओ शेअर केलाय एका आयएएस अधिकाऱ्याने. त्याला सुद्धा या व्हिडीओने प्रेमात पाडलंय. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं, त्या दोघांचा आनंद पाहून असं वाटतं की, जणू काही त्याने सेकंड हँड सायकल नव्हे तर मर्सिडीज कार विकत घेतली आहे. हा व्हिडिओ व्हिडीओ शेअर केलाय एका आयएएस अधिकाऱ्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ही फक्त सेकंड हँड सायकल आहे. पाहा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. जणू काही त्याने नवीन मर्सिडीज-बेंझ विकत घेतली आहे, असे त्याचे हावभाव सांगतात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.