Viral : बाहेरून झोपडी, आतून कमाल, Video पाहून म्हणाल, माझं असं घर कधी होणार
Social Media Viral Hut : सोशल मीडियावर एका झोपडीवजा घराची सध्या तुफान चर्चा आहे. बाहेरून अगदी सर्वसाधारण दिसणार्या या घराच्या आतील नजरा तुमचे डोळे विस्फारून टाकल्याशिवाय राहणार नाही. दिसते तसे नसते म्हणून....

‘दिसते तसे नसते म्हणून जग फसते’, ही म्हण तर तुमच्या किती वेळा कानावर पडली असेल. एखादी गोष्ट जशी आपल्याला वाटते तशी नसली की आपण अशी सहाजिकच प्रतिक्रिया देतो. तर सोशल मीडियावर या झोपडीवजा घराबाबत लोक अशीच प्रतिक्रिया देत आहे. या घराची समाज माध्यमांवर तुफान चर्चा सुरू आहे. या घराच्या आतील नजरा तुमचे डोळे विस्फारून टाकल्याशिवाय राहणार नाही. याविषयीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. असं काय आहे या व्हिडिओत?
असं काय आहे या व्हिडिओत?
या Video मध्ये एक झोपडीवजा घर दिसत आहे. बाहेर दोन खुर्च्या दिसत आहे. बाहेरून हे सर्वसाधारण घर दिसत आहे. पण जसा कॅमेरा घरात जातो. तेव्हा अनेकांचे डोळे विस्फरतात. आतील नजाराच सर्वांना धक्का देतो. या घरात एक मोठा एलईडी टीव्ही दिसते. त्याच्या जवळच एक मोठा बेड दिसतो. शेजारीच आलिशान सोफा, टीव्ही कॅबिनेट आणि एक छोटे कूलर सुरू असल्याचे दिसते.
तर घरातील भिंतीवर पेटिंग आणि इतर कलाकृती तुमचे लक्ष वेधून घेतात. किचन पण स्टाईलिश असल्याचे दिसते. हे घर पूर्णपणे एअर कंडिशन्ड केलेले आहे. बाथरूममध्ये सुद्धा एसी लावलेला दिसतो. या घरात एक वेस्टर्न टॉयलेट आणि वॉशिंग मशीन दिसते. याशिवाय किचनमध्ये आरओ वॉटर फिल्टर लावण्यात आलेले दिसते. हे घर पाहिल्यावर तुम्ही आपले असे घर कधी होईल, याचा जरूर विचार कराल.
View this post on Instagram
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @7stargrandmsti नावाच्या खात्यावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान चर्चेत आहे. 10 मार्च रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत 4 लाख 60 हजाराहून अधिक लोकांनी तो पाहिलाय. तर त्यावर कमेंट्सचा महापूर आला आहे. बाहेरून झोपडी आणि आतून हा महल असल्याची कमेंट एका युझरने केली आहे. जर अशी झोपडी असेल तर मग महल, बंगल्याची काय गरज अशी कमेंट दुसऱ्या एका युझरने केली आहे.