Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : नूडल्सपासून महिला विणतेय स्वेटर, सहा लाखांहून अधिक यूझर्सनी पाहिलाय ‘हा’ Video

अनेक महिलांना थंडीच्या वातावरणात लोकरीपासून स्वेटर, मफलर वगैरे विणताना पाहिलं असेल. पण सोशल मीडिया(Social Media)वर असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तो पाहून तुम्हालाही असंच काहीतरी करण्याची इच्छा होईल.

Viral : नूडल्सपासून महिला विणतेय स्वेटर, सहा लाखांहून अधिक यूझर्सनी पाहिलाय 'हा' Video
नूडल्सपासून विणकाम
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 11:53 AM

सध्या थंडी(Cold)चा कडाका आहे. अनेकांनी आपलं ब्लँकेट(Blanket)देखील अजून काढलेलं नाही. काहींनी तर स्वेटर अंगातून काढलेलं नाही. जगाच्या विविध भागात थंडीची लाट कायम आहे. अशा परिस्थितीत लोकांचा आधार म्हणजे उबदार कपडे. तुम्ही अनेक महिलांना थंडीच्या वातावरणात लोकरीपासून स्वेटर, मफलर वगैरे विणताना पाहिलं असेल. पण सोशल मीडिया(Social Media)वर असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तो पाहून तुम्हालाही असंच काहीतरी करण्याची इच्छा होईल. व्हिडिओ मनोरंजनात्मक आहे.

अप्रतिम कला

आपण चॉपस्टिक्सच्या मदतीनं नूडल्स विणत असलेली एक स्त्री पाहू शकता. होय, एका भांड्यात शिजवलेले नूडल्स आहेत, ते खाण्याऐवजी, ती महिला त्यामधून ‘स्वेटर’ विणत आहे. म्हणजे ती लोकर म्हणून नूडल्स वापरताना दिसतेय. त्यामुळेच या महिलेची ही अप्रतिम कला पाहून इंटरनेटवरील यूझर्सही आश्चर्यचकित झाले आहेत. अनेक यूझर्सना ही संकल्पना आवडलीय. नूडल्स खाताना एकादी व्यक्ती तरी किंवा महिला अशाप्रकारे चॉपस्टिक्स घेऊन स्वेटर विणण्याचा प्रयत्न करेल. अर्थात हे कौशल्याचं काम आहे. पण प्रयत्न करणारेही काही कमी नाहीत.

ट्विटर हँडलवर शेअर

mixiaoz या ट्विटर हँडलवर ही क्लिप शेअर करण्यात आली आहे. याला 6 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच 3 लाखांहून अधिक यूझर्सनी या ट्विटला लाइक केलं असून 81 हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे. तर यावर शेकडो यूझर्सनी आपली प्रतिक्रियादेखील दिली आहे. एका यूझरनं लिहिलंय, की इथं चॉपस्टिक्ससह नूडल्स खाल्ले जात नाहीयेत तर त्यातून स्वेटर बनवले जात आहे. तर इतरांनी याला अप्रतिम कलाकृती म्हटलं आहे.

सोशल मीडियाबद्दल काहीच माहिती नाही, तरीही मलावीयन संगीतकार टिकटॉकवर सुपरहिट, 80 लाखांहुन अधिक जणांनी पाहिले व्हिडीओ

Video : चुकीला माफी नाही..! स्कूटीवर स्टंट करणं तरुणीला पडलं भारी; अशी काही आपटली, की…

Video : Pushpaच्या अल्लू अर्जुनचा ‘असा’ही फॅन…. अप्रतिम डान्स करून जिंकलं नेटकऱ्यांचं मन

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.