VIDEO: ‘दुसरी नाही, ही हातातील बंदुकच हवी’, रस्त्यावर सैनिकाला पाहून पाहून हट्ट करणाऱ्या लहानग्याचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर कायमच लहान मुलांचे निरागस फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया युजर्स आवडीने पाहत असलेल्या व्हिडीओंमध्ये लहान मुलांच्या व्हिडीओचाही समावेश असतो.

VIDEO: 'दुसरी नाही, ही हातातील बंदुकच हवी', रस्त्यावर सैनिकाला पाहून पाहून हट्ट करणाऱ्या लहानग्याचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 6:39 PM

नवी दिल्ली : सोशल मीडियावर कायमच लहान मुलांचे निरागस फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया युजर्स आवडीने पाहत असलेल्या व्हिडीओंमध्ये लहान मुलांच्या व्हिडीओचाही समावेश असतो. अनेक लोक हे व्हिडीओ मोठ्या आवडीने पाहत असल्याचं दिसतं. आताही सोशल मीडियावर असाच लहान मुलाचा हट्ट करतानाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. यात हे मुल रडत रडत एका सैनिकाकडे त्याची खरीखुरी बंदुक मागताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येत आहे (Viral Video of crying children demanding soldiers gun).

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आपल्या आईसोबत बाजारात आलेला असताना तेथे तैनात सैनिकाची बंदूक पाहतो. त्यानंतर ते लहान मुल त्या सैनिकाच्या जवळ जाऊन त्या बंदुकीला हात लावत मला ती हवी असा हट्ट करतं. आपला हट्ट पूर्ण करुन घेण्यासाठी तो रडत रडत बंदुक हवी म्हणून सांगताना दिसत आहे. त्याचा हा हट्ट पाहून संबंधित सैनिका देखील त्याची समजूत घालतो. तसेच मी तुला दुसरी बंदूक देतो असं सांगतो. मात्र, हे लहानसं मुल मला दुसरी नको हीच बंदूक हवी म्हणून पुन्हा रडायला सुरुवात करतं. यानंतर येथे उपस्थित असलेले सर्व लोकांना हसू आवरलं नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहणारे अगदी पोट धरुन हसत आहेत.

सैनिकाच्या हातातील बंदूक ओढत लहानग्याचा हट्ट

या व्हिडीओत संबंधित सैनिक रस्त्याच्या कडेला तैनात आहे. त्यावेळी बाजूने जाणाऱ्या एका महिलेचा छोटा मुलगा सैनिकाच्या हातातील बंदुक पाहतो. त्यानंतर लगेच तो त्या सैनिकाज्या जवळ जाऊन त्या बंदुकीला हात लावत, काहीशी ओढत आपल्यालाही ती बंदूक हवी असल्याचं सांगतो. त्याला ती बंदूक न मिळाल्याने तो रडत आहे. तो त्या सैनिकाकडे बंदुकीचा आग्रह करत ती मिळणार नाही तोपर्यंत येथून जाणार नाही असंच जणुकाही सांगत आहे. अखेर आपला मुलगा खूपच हट्ट करत असल्याचं पाहून त्याची आई त्याला त्या सैनिकाजवळून उचलून घरी घेऊन जाते.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठलं आहे याचा तपास लागलेला नाही. मात्र, लहान मुलाच्या नटखट हट्टाने अनेकांना आपल्या लहानपणीचे दिवस आठवले आहेत. आपणही लहानपणी मनात येणाऱ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून काहीसे असेच हट्ट करत असल्याचं अनेकजण कमेंट करत सांगत आहेत.

या गमतीशीर व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत त्या मुलाविषयी आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तसेच आपल्या लहानपणीच्याही अशाच गमतीजमती सांगत आहेत. युजर्सला हा व्हिडीओ खूपच निरागस वाटत आहे. अनेकांनी मुलाचा हट्ट म्हणजे त्याचा बालसुलभ हट्ट असल्याचं म्हटलं.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

VIDEO : ‘मला माझ्या नवऱ्याकडे जाऊ द्या’, चिमुकलीचा बालहट्ट, ढसाढसा रडली!

अय शंकरपाळ्या…. सोशल मीडियावर व्हायरल झालेले ‘ते’ भांडण अखेर मिटले

75 वर्षांच्या आजोबांचे नातवांच्या शिक्षणासाठी काबाडकष्ट; एकाही पैशाचा खर्च नको म्हणून रिक्षातच झोपतात

Viral Video of crying children demanding soldiers gun

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.