मुंबई! लोकलला तोड नाय, लोकांना तोड नाय, या व्हिडीओलाही तोड नाय…
मरिन ड्राइव्हवर मोठ्या प्रमाणात गरबा सादर करणाऱ्या लोकांचा प्रचंड गर्दीचा व्हिडिओ नुकताच समोर आला होता. असे व्हिडीओ नक्कीच आपल्या चेहऱ्यावर हास्य आणतात.
सणासुदीचा हंगाम आहे. प्रत्येकजण उत्सव साजरा करण्याच्या मनःस्थितीत आहे. या आठवड्यात नवरात्र सुरू झाल्यापासून गरब्याचे अनेक व्हिडीओ समोर आलेत. मरिन ड्राइव्हवर मोठ्या प्रमाणात गरबा सादर करणाऱ्या लोकांचा प्रचंड गर्दीचा व्हिडिओ नुकताच समोर आला होता. असे व्हिडीओ नक्कीच आपल्या चेहऱ्यावर हास्य आणतात. आता, महिलांच्या एका गटाने चालत्या लोकल ट्रेनमध्ये असंच काहीसं केलंय. आणखी एक क्लिप ऑनलाइन व्हायरल झाली आहे.
सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओ मुंबई रेल्वे युझर्स नावाच्या पेजने ट्विटरवर शेअर केला आहे. या छोट्याशा क्लिपमध्ये कल्याणहून लोकल ट्रेनमध्ये महिलांचा एक ग्रुप गरबा करताना दिसतोय. हे प्रवासी उत्साहाने नृत्य करतायत तर इतर प्रवाशांनी त्याचा आनंद घेतलाय.
‘मुंबईतील लोकलमुळे असे क्षण निर्माण होतात. कालच्या 10.02 मध्ये कल्याणहून #AClocal. मजेला कोणतीही मर्यादा नसते,” असं या पोस्टचं कॅप्शन आहे.
#Garba #Navrathri MUMBAI LOCALS CREATE MOMENTS Now in yesterday’s 10.02 am #AClocal from Kalyan. FUN HAS NO LIMIT. pic.twitter.com/Hruzxwbeqr
— Mumbai Railway Users (@mumbairailusers) September 28, 2022
लोकांनी हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात शेअर केला. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या.
Vibessss https://t.co/dIS5dyxpLl
— Chai Aur Poha (@chaiaurpoha) September 28, 2022
Spirit of #Mumbai .. https://t.co/II2sagc64U
— Tony C Rai (@Manthankaro) September 28, 2022