Viral Video : भल्या मोठ्या सापाला आपल्या ओंजळीनं पाजलं पाणी, यूझर्स म्हणतायत…
सध्या सोशल मीडिया(Social Media)च्या जगात सापांशी संबंधित असा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील. व्हिडिओमध्ये एक माणूस सापाला पाणी देताना दिसत आहे, तोही त्याच्या ओंजळीमध्ये.
साप (Snake) लहान असो वा मोठा, त्याला पाहताच माणसाची भीतीनं गाळण उडते. अशा परिस्थितीत अचानक एखादा भला मोठा भयानक साप दिसला तर? साहजिकच तुम्हाला घाम फुटेल. सापापासून वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावायला लागाल. पण सध्या सोशल मीडिया(Social Media)च्या जगात सापांशी संबंधित असा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील. व्हिडिओमध्ये एक माणूस सापाला पाणी देताना दिसत आहे, तोही त्याच्या ओंजळीमध्ये. होय, ही व्यक्ती आपल्या ओंजळीमध्ये पाणी भरून सापाला देत आहे.
साप व्यक्तीवर हल्ला करत नाही
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की घरातल्या एका व्यक्तीनं एका प्लेटच्या वर एक भांडं ठेवलं आहे. हे पाण्यानं भरलेलं आहे. तर त्याच्या हातात एक मोठा साप दिसतोय. ही व्यक्ती आपल्या ओंजळीनं या सापाला पाणी देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून काहींना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर काहींनी तो पाहिल्यानंतर त्या व्यक्तीला वेडा म्हटलंय. साप किती भयंकर दिसतोय हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मात्र पाणी पिणारा साप व्यक्तीवर हल्ला करत नाही.
थक्क करणारं दृश्य
हे दृश्य खरोखरच थक्क करणारं आहे. कारण साप हा विषारी प्राणी आहे. जर तो एखाद्याला चावला तर त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळेच आपण सापाला घाबरत असतो. ही व्यक्ती मात्र ज्या पद्धतीनं निर्भयपणे त्याला पाणी देताना दिसत आहे, ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
इन्स्टाग्रामवर अपलोड
सापाचा हा अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ snakes.empire या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 8 जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. तेव्हापासून त्याला 2 लाख 13 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. ही संख्या सातत्यानं वाढतेय. सोशल मीडिया यूझर्स या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. काही जणांनी तर या व्यक्तीला वेडं म्हटलं आहे.
View this post on Instagram
‘साप कधीच माणसांचा मित्र असू शकत नाही’
एका यूझरनं कमेंट करताना लिहिलं, की ‘हा माणूस मूर्ख आहे का, साप कधीच माणसांचा मित्र असू शकत नाही आणि तो त्याला पाणी देत आहे.’