Viral Video : जिराफासोबत पंगा पडला भारी, महिलेला शिकवला चांगलाच धडा

सोशल मीडिया(Social Media)वर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यांचे व्हिडिओही ते येताच इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात. आता याच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आलाय, यामध्ये दोन जिराफ (Giraffe) दिसत आहेत. यातील एक जिराफ असं काही करतो, जे पाहून तुम्हीही हसाल.

Viral Video : जिराफासोबत पंगा पडला भारी, महिलेला शिकवला चांगलाच धडा
जिराफाचा महिलेवर हल्ला
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 11:53 AM

सोशल मीडिया(Social Media)वर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यांचे व्हिडिओही ते येताच इंटरनेटवर व्हायरल (Viral) होतात. आता यापैकी काही व्हिडिओदेखील समोर आले आहेत, हे व्हिडिओही खूप मजेदार आहेत. असेही काही आहेत, ज्यांना पाहून प्रत्येकाला समजतं की प्राण्यांना त्रास होणारी कोणतीही कृती माणसासाठी त्रासदायक ठरू शकते. आता याच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आलाय, यामध्ये दोन जिराफ (Giraffe) दिसत आहेत. यातील एक जिराफ असं काही करतो, जे पाहून तुम्हीही हसाल.

इन्स्टाग्रामवर शेअर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला जिराफसोबत मस्ती करताना दिसतेय. तिला वाटतं, की जिराफ तिला काहीही करणार नाही. पण त्या महिलेनं जिराफाला हात लावताच तिच्या शेजारी उभा असलेल्या दुसऱ्या जिराफाला राग येतो आणि तो अशाप्रकारे त्या महिलेला धडा शिकवतो. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. तुम्ही hotelsandresorts नावाच्या अकाउंवर सर्व व्हिडिओ पाहू शकता.

महिलेला दिला चांगलाच धडा व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिलंय, की जेव्हा तुम्ही चुकीच्या जिराफाशी पंगा घेता… जेव्हापासून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय, तेव्हापासून तो इंटरनेटवर व्हायरल होताना पाहायला मिळतोय. या व्हिडिओला एक लाखाहून अधिक लाइक्स मिळालेत. जिराफानं महिलेच्या तोंडाला ज्याप्रकारे फटका मारला, त्यामुळे तिला वेदना होत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय. महिला ज्यापद्धतीनं रिअॅक्ट झाली, ते पाहूनच याचा अंदाज येतो. यानंतर ती महिला कधीही कोणत्या प्राण्याशी पंगा घेणार नाही, हे निश्चित.

मजा करा, पण.. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनवरही हजारो कमेंट्स पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, खरंच, थोडा विचार करून प्राण्यासोबत मजा करा. अन्यथा परिणाम असे काही होऊ शकतात. दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, प्राणी लहरी असतात, त्यामुळे त्यांच्यापासून ठराविक अंतर ठेवलं पाहिजे. तिसऱ्या यूजरनं लिहिलंय, प्राणी जितके गोंडस आहेत तितकेच ते धोकादायक आहेत.

Viral Video : माकडाला पकडायचा होता पाण्याचा बुडबुडा, मग काय झालं? पाहून तुम्हालाही येईल हसू

शेंगदाण्याचं कर्ज फेडण्यासाठी 11 वर्षांनंतर भारतात परतले बहीण-भाऊ! Photo Viral

VIDEO : चिमुकल्याने टिचरसमोर गायले ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी…’ पाहा पुढे काय झाले!

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.