AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samruddhi Highway: दोन काळवीटांमुळे समृद्धी महामार्ग चर्चेत! एकमेकांना म्हणाली,”चल ना बे पोट्टे नाहीत तोवर पळून घेऊ!”

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील असेगाव ते वर्धा दरम्यान उद्घाटनाआधीच दोन काळवीटांनी समृद्धी महामार्गावर पैज लावल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही काळवीटं नेमकी पैज लाऊन पळतायत की महामार्ग तपासून बघतायत असा प्रश्न पडतो.

Samruddhi Highway: दोन काळवीटांमुळे समृद्धी महामार्ग चर्चेत! एकमेकांना म्हणाली,चल ना बे पोट्टे नाहीत तोवर पळून घेऊ!
दोन काळवीटांमुळे समृद्धी महामार्ग चर्चेत! Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 8:01 PM

अमरावती: कधी उद्धाटनाचा वादच काय झाला, कधी पूलच काय कोसळून पडले, नागपूर ते अमरावती (Nagpur To Amravati) समृद्धी महामार्ग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिलाय. या सगळ्या अडचणींमुळे महामार्गाचं उद्धाटनही पुढे ढकललं जातंय. अजून उद्धाटन नाही तरीसुद्धा अनेकांना समृद्धी महामार्गावर सैर करण्याचा मोह काय सुटता सुटत नाही. त्यामुळे अनेकजण उदघाटनाआधीच सैर करून आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील असेगाव ते वर्धा दरम्यान उद्घाटनाआधीच दोन काळवीटांनी समृद्धी महामार्गावर पैज लावल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral On Social Media) झाला आहे. ही काळवीटं नेमकी पैज लाऊन पळतायत की महामार्ग तपासून बघतायत असा प्रश्न पडतो. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे, खरंतर या व्हिडीओमुळे समृद्धी महामार्गच (Samruddhi Highway) चर्चेत आलाय असं म्हणायला हरकत नाही.

प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

समृद्धी महामार्गावर कोणतेही जंगली प्राणी येऊ नये व नागपूर ते मुंबई हा प्रवास सुसाट व्हावा यासाठी रस्त्याच्या दुतर्फा 15 फूट उंच सौरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. तरीही ही दोन काळवीटं समृद्धी महामार्गावर आले कसे असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.आता व्हिडीओ जरी वायरल झालेला असला तरी समृद्धी महामार्गावरून होणाऱ्या प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय.

व्हिडीओ पाहिलात?

हे सुद्धा वाचा

“चल जरा पळून बघूयात महामार्ग कसा वाटतोय”

व्हिडिओत दोन काळवीट तुफान वेगात पळत सुटलेले दिसतायत. हा व्हिडीओ प्रचंड वायरल झालाय. बघून असं वाटतं पाळायच्या आधी या दोघांनी पैज लावली असेल,”चल जरा पळून बघूयात महामार्ग कसा वाटतोय” असं ते एकेमकांत म्हणले असतील. हा व्हिडीओ समोर येताच महामार्गावरील सुरक्षेच्या प्रश्न उभा राहिलाय. तुफान वेगात पळत सुटणारी काळवीटं मात्र मन जिंकून घेतायत. पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल असा हा व्हिडीओ आहे. उद्घाटन कधीही होऊ, त्या आधीच या काळवीटांनी मस्त मजा करून घेतलीये! छान बागडून घेतलंय, माणसं रस्त्यावर येऊन गर्दी करायच्या आत मनसोक्त पळून घेतलंय!

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.