Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काका ऐकत नाहीत आता..! Michael Jacksonलाही दिलीय टक्कर, Viral dance video पाहून हसून हसून लोटपोट व्हाल

Funny dance video : व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ एका काकांचा (Uncle) आहे, ज्यांनी डान्स करताना अशा स्टेप्स दाखवल्या, जे करण्याआधी मायकल जॅक्सनसुद्धा (Michael Jackson) दहा वेळा विचार करेल.

काका ऐकत नाहीत आता..! Michael Jacksonलाही दिलीय टक्कर, Viral dance video पाहून हसून हसून लोटपोट व्हाल
काकांचा अफलातून व्हायरल झालेला डान्सImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 10:47 AM

Funny dance video : नृत्याची आवड असलेल्या लोकांना कोणत्याही विशेष प्रसंगाची गरज नसते, ते कुठेही आणि कधीही सुरू करतात. ते ना जागा पाहतात, ना वय… जिथे संधी मिळेल तिथे ते नाचू लागतात. आपल्या देशात नृत्यप्रेमींची कमतरता नाही. कुठेही गाणे ऐकले की पाय थिरकायला लागतात. ते अशा उत्साहाने नाचतात, की आजूबाजूला असलेल्या सर्व गोष्टी विसरून जातात आणि बरेचदा हे लोक अशा काही भन्नाट डान्स स्टेप्सला करतात, की आपले मात्र हसून हसून पोट दुखते. व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ एका काकांचा (Uncle) आहे, ज्यांनी डान्स करताना अशा स्टेप्स दाखवल्या, जे करण्याआधी मायकल जॅक्सनसुद्धा (Michael Jackson) दहा वेळा विचार करेल. स्टेप्सबद्दल काहीही म्हणा, पण काकांना त्याच्या परफॉर्मन्ससाठी आणि आत्मविश्वासासाठी पूर्ण 100 गुण मिळायला हवेत.

इन्स्टाग्रामवर शेअर

व्हिडिओमध्ये काही प्रोफेशनल डान्सर्स स्टेजवर डान्स करत आहेत, त्यादरम्यान एक काका येतात आणि त्या डान्सर्ससोबत डान्स करायला लागतात. आपल्या परफॉर्मन्सदरम्यान काका अशा स्टेप्स दाखवतात, की तिथे उपस्थित लोक टाळ्या वाजवतात. अंकलचा डान्स इतका मजेशीर असतो, की मागचे डान्सर्सही स्टेप्स विसरून अंकलला बघायला लागतात. हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर praviningle45 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आता सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पसरत आहे, कारण लोक या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती देत ​​आहेत.

‘मन तरूण असावे’

अनेक यूझर्सनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका यूझरने म्हटले, की वयाची कोणतीही अट नसावी… मन तरूण राहिले पाहिजे, वय काहीही असो..!. दुसरीकडे, दुसर्‍या यूझरने लिहिले, की अंकल जी नवीन मूनवॉक स्टाइल घेऊन आले आहेत, आश्चर्यकारक! आणखी एका यूझरने लिहिले, की काका खरोखर एक लीजेंड डान्सर आहेत. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या व्हिडिओवर आणि त्यातल्या काकांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा :

Dance ऐन रंगात आला असतानाच होतं ‘असं’ काही, की खुदकन् हसायला येईल..! Video viral

Skating करण्याआधी Safety पाहिली नाही की ‘असं’ होतं! असे स्टंट करताना जरा जपूनच…

Viral video : ‘हे’ सर्वजण अख्ख्या रेल्वेला का ओढत आहेत? कारण ऐकून आश्चर्यचकित व्हाल आणि कौतुकही कराल

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.