Video : चुकीला माफी नाही..! स्कूटीवर स्टंट करणं तरुणीला पडलं भारी; अशी काही आपटली, की…

एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. जे पाहून, अशा धोकादायक स्टंट(Stunt)चा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीला हसायचं की सहानुभूती व्यक्त करायची, हे तुम्हाला समजणार नाही.

Video : चुकीला माफी नाही..! स्कूटीवर स्टंट करणं तरुणीला पडलं भारी; अशी काही आपटली, की...
स्टंट करणारी तरुणी
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 10:30 AM

सोशल मीडिया(Social Media)वर मनोरंजना(Entertainment)चे अनेक स्त्रोत आहेत. जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर वेगवेगळ्या साइट्सवर जा आणि मनोरंजन करा. इंटरनेटच्या जगात इतकं काही आहे, की तुमचा वेळ सहज जाईल. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. जे पाहून, अशा धोकादायक स्टंट(Stunt)चा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीला हसायचं की सहानुभूती व्यक्त करायची, हे तुम्हाला समजणार नाही. मात्र अनेकजण असे स्टंट करून फसले तरी शहाणे मात्र होत नाहीत. मग सोशल मीडियावर त्यांची खरडपट्टी काढायला यूझर्स अॅक्टिव्ह होतात.

चूक केली आता…

स्टंटबाजी हा काही लहान मुलांचा खेळ नाही, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कुठलाही स्टंट करायचा असेल तर खूप सराव करावा लागतो, मग कुठेतरी त्या कलेमध्ये प्राविण्य मिळवता येतं, पण थोडी चूक झाली तर तो स्टंट फसतोच आणि दुखापतही होणार हे नक्की. आता हा व्हिडिओ बघा एक-दोन महिला स्टंट करण्याचा प्रयत्न करतात पण नंतर त्यांच्यासोबत असं काही घडतं, की संपूर्ण खेळाचा विचका होतो.

असा काही तोल गेला, की…

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन मुली त्यांच्या स्कूटीवर कॅमेऱ्यासमोर स्टंट करण्यासाठी उभ्या आहेत, कॅमेरामननं जा असे म्हणताच, मुलींनी त्यांची स्कूटी सुरू करून स्टंट करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर त्यांच्यापैकी एकीचा तोल असा काही ढासळतो, की ती जमिनीवरच आपटते.

‘गरजच काय?’

ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, ते तर म्हणतायत, की एकाच चाकावर स्कूटी चालवायची काय गरज होती. त्याचबरोबर असे धोकादायक स्टंट करणाऱ्या महिलांना अनेकांनी फटकारलं आहे. असं करून तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याचं काही यूझर्सचं म्हणणे आहे, तर काहींनी प्रोफेशनल लोकांनी असे प्रकार केले तर बरं, असं म्हटलं आहे. bboyz.sbk अकाऊंटच्या नावानं हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ 76 हजार लोकांनी पाहिला आहे.

सोशल मीडियाबद्दल काहीच माहिती नाही, तरीही मलावीयन संगीतकार टिकटॉकवर सुपरहिट, 80 लाखांहुन अधिक जणांनी पाहिले व्हिडीओ

Video | सेल्फीसाठी जीव धोक्यात! नदीत बुडत असलेल्या गाडीवर उभा राहून महिलेने घेतला सेल्फी

Viral video| हिरो बनून कुत्र्याने वाचवले हरणाचे प्राण; लोकांकडून श्वानाच्या शौर्याचे कौतुक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.