देवदूतच जणू… प्राणांचीही पर्वा न करता ‘तिने’ गाडीखाली येणाऱ्या वृद्धाचा जीव वाचवला, video व्हायरल

पुरुलिया येथे एक वृद्ध व्यक्ती धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या घाईत पाय घसरून पडली आणि गाडीखाली आली. तेवढ्यात..

देवदूतच जणू... प्राणांचीही पर्वा न करता 'तिने' गाडीखाली येणाऱ्या वृद्धाचा जीव वाचवला, video व्हायरल
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 11:51 AM

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अर्थात आरपीएफच्या (RPF) एका महिला अधिकाऱ्याने असीम धाडस दाखवले. चालत्या गाडीत (moving train) चढण्याचा प्रयत्न करताना पाय घसरून पडल्याने गाडीखाली आलेल्या वृद्धाचा जीव (saved old man) त्या महिलेने वाचवला. त्या महिलेच्या तडक कृतीमुळे कोणतीही संभाव्य दुर्घटना (accident)घडल्यापासून रोखली गेली. या घटनेनरून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचार्‍यांचे महत्त्व ही घटना अधोरेखित होते.

पुरुलिया स्थानकातून एक गाडी सुटली असता, एक वृद्ध व्यक्ती धावत्या ट्रेनमध्ये चढायचा प्रयत्न करू लागली. मात्र दुर्दैवाने त्याचा पाय घसरला व तो फलाट आणि रेल्वे यांच्या मध्ये सापडला. मात्र त्यावेळी स्टेशनवर उपस्थित असणाऱ्या आरपीएफच्या महिला अधिकाऱ्याने जलद कृती करत त्या व्यक्तीला ट्रेनखालून खेचून काढले. तितक्यात तेथे इतर ऑफीसर्सही मदतीसाठी आले व ती वृद्ध व्यक्ती वाचली. सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही व थोड्या वेळातच उठून चालू-फिरू लागला.

पहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. रेल्वे मंत्रालयानेही हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत त्या महिला अधिकाऱ्याचे कौतुक केले आहे. त्या महिला अधिकाऱ्याने दाखवलेले प्रसंगावधान आणि शौर्य यामुळे सोशल मीडियावरही सर्वजण तिचे कौतुक तसेच तिचे अभिनंदनही करत आहे.

मात्र रेल्वे प्रवासादरम्यान, अथवा गाडीत चढताना नेहमीच सावध रहावे, कोणतीही अनावश्यक जोखीम घेऊ नये. अशा वेळी दक्षता आणि सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, हेही या व्हिडीओवरून स्पष्ट होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.