AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : 48 कोटींहून जास्त वेळा पाहिला गेलाय ‘हा’ व्हिडिओ, काय आहे खास? तुमचंही डोकं चक्रावून जाईल

'सोशल मीडिया(Social Media)चं जग' अप्रतिम आहे. त्यात तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर स्क्रोल करताना अनेक मजेदार व्हिडिओ (Video) पाहायला मिळतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये एक माणूस गुरुत्वाकर्षणा(Gravity)ला चकवा देतोय.

Video : 48 कोटींहून जास्त वेळा पाहिला गेलाय 'हा' व्हिडिओ, काय आहे खास? तुमचंही डोकं चक्रावून जाईल
Xavier Mortimer
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 5:13 PM

‘सोशल मीडिया(Social Media)चं जग’ अप्रतिम आहे. जर तुम्ही त्यात सक्रिय असाल, तर तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर स्क्रोल करताना अनेक मजेदार व्हिडिओ (Video) पाहायला मिळतील. यातले काही धक्कादायक असतात, तर काहींमध्ये धमाल. काहींमध्ये तर वेगवेगळ्या युक्त्या केलेल्या पाहायला मिळतात. त्या पाहताना आपला त्यावर विश्वासही बसणार नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये एक माणूस गुरुत्वाकर्षणा(Gravity)ला चकवा देतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलं डोकं आणि डोळे चक्रावून जातील. पाहू या या व्हिडिओमध्ये असं काय आहे, जे पाहून सगळेच हैराण झालेत.

जसं काही माहीतच नाही व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्रकिनाऱ्यावर खुर्चीवर बसलेला एक व्यक्ती पुस्तक वाचताना दिसतोय. मग त्याचा मित्र गुपचूप खुर्ची ओढतो. पण पुढे काय झालं? तो माणूस खुर्चीशिवाय हवेतच बसून राहतो. जणू काही जादू होतेय. त्याचवेळी एका महिलेनं त्याला आश्चर्यानं विचारलं, की तू खुर्चीशिवाय कसा बसला आहेस. यावर ती व्यक्ती त्याला काहीच माहीत नसल्यासारखी प्रतिक्रिया देते. त्यानंतर जे काही घडतं, ते आणखी मजेशीर असतं. चला, आधी हा व्हिडिओ पाहू या.

युझरची कॅप्शन… हा व्हिडिओ यूट्यूबवर झेवियर मॉर्टिमर (Xavier Mortimer) नावाच्या चॅनलवर शेअर करण्यात आलाय. जेवियर त्याच्या चॅनलवर जादूच्या युक्त्या आणि स्टंट व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याचा हा व्हिडिओ जानेवारीचा आहे, पण तरीही लोक त्यावर कमेंट करत आहेत. याच कारणामुळे हा व्हिडिओ अजूनही चर्चेत आहे. युझरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘Impossible Balance.’ हा 18 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आतापर्यंत 48 कोटींहूनही जास्त वेळा तो पाहण्यात आलाय.

1 कोटी लोकांनी केला लाइक हा व्हिडिओ 1 कोटी लोकांनी लाइक केला, यावरून याचा अंदाज येतो. त्याचबरोबर 27 हजारांहून अधिक लोकांनी यावर आपल्या कमेंट दिल्यात. झेवियर मॉर्टिमरची युक्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं.

Viral Video : अय्यो…! वरमाला घालण्यापूर्वी वरानं घातली ‘अशी’ अट, की वधूही लाजली!

VIDEO : जिना आणि छत पाहून नेटिझन्सची सटकली, म्हणतात, कोरोना काळातील ऑनलाईन क्लासचा परिणाम दिसतोय

VIDEO : मांजर आणि उंदरामधली अशी मैत्री तुम्ही कधीही पाहिली नसेल, पाहा खास व्हिडीओ!

कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?.
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार.
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच.