Viral video : छोट्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल, चिमुकला सुरुवातीला पडला, पाहा पुढे नेमकं काय झालं?
तुम्ही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या तोंडून एक कविता अनेकदा ऐकली असेल. की, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. याच गोष्टीची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होतोय. हा व्हिडीओ चिमुकल्याचा असून तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून प्रोत्साहीत व्हाल.
मुंबई : तुम्ही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh bacchan) यांच्या तोंडून सोहन लाल द्विवेदी (sohan lal dwivedi) यांची ती कविता अनेकदा ऐकली असेल. की, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. ही गोष्ट आपल्याला अनेक अनुभवातून समोर येते. प्रयत्न करणारे कधी ना कधी यशस्वी होतातच. भलेही सुरुवातीला त्यांना अपयश आलं असेल. पण, नेहमीच अपयश येईल असंही नाही. प्रयत्न केला तर यश नक्की मिळतं. फरक फक्त इतकाच की कुणाला आधी यश मिळतं आणि कुणाला नंतर यशोशिखर गाठता येतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये कवी सोहन लाल द्विवेदी यांच्या कवीतेशी मिळताजुळता यशाचा प्रसंग या व्हिडीओतून दिसून येतोय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होतोय. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून प्रोत्साहीत व्हाल.
व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
या व्हिडीओमध्ये छोट्या मुलांची सायकल स्पर्धा चालू असल्याचं दिसतंय. लहान मुलांची ही स्पर्धा सुरू झाली की सगळे आपली सायकल इतरांपेक्षा पुढे नेण्याच्या प्रयत्न करतात. एकमेकांची एकमेकांशी स्पर्धा सुरु असताना एक मुलगा अचानक सायकल घेऊन खाली पडतो आणि इतर मुलं आपापली सायकल घेऊन पुढे निघून जातात. आता जो चिमुकला सायकल घेऊन खाली पडतो. तो निराश न होता किंवा स्पर्धेतून बाहेर न पडता पुन्हा प्रयत्न करु लागतो. थोड्या वेळानंतर हाच खाली पडलेला मुलगा सायकल घेऊन इतर मुलांच्या जवळ पोहोचतो. त्यानंतर तो त्याची सायकल इतक्या वेगानं चालवतो की इतर सर्व मुलं मागे पडतात. त्यानंतर तो मुलगा सायकल स्पर्धा जिंकतो. त्या चिमुकल्याची इच्छाशक्ती आणि प्रयत्नाचा परिपाक त्याला यशोशिखर गाठता येतं आणि याच व्हिडीओतून पुन्हा एकदा कवी सोलन लाल द्विवेदी यांच्या कवितेची प्रचिती येते.
“फर्क इससे नहीं पड़ता कि आपने कहाँ से शुरुआत की, फर्क इससे पड़ता है कि आप पहुँचे कहाँ हो.” pic.twitter.com/Qfm9TE3nJG
— Awanish Sharan (@AwanishSharan) March 9, 2022
व्हिडीओला लाखो लाकांची पसंती
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी या व्हिडोओला ट्विटरवर शेअर केलं आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीलंय की, आपन कुठून सुरुवात केली यानं काहीही फरक पडत नाही, फरक यानं पडतो की आपनं कुठे पोहोचलो, असं आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहीलंय. 27 सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाख 37 हजारांपेक्षा अधिक लोकांनी बघितलं आहे. तर 14 हजार पेक्षा अधिक लोकांना या व्हिडोओला लाईक केलं आहे. हा त्या चिमुकल्याचा प्रोत्साहीत करणारा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
इतर बातम्या