Video: दुबईतील प्रसिद्ध हॉटेलसमोर वाघासोबत स्टंट, नेटकरी भडकले, कमेंट्समध्ये नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये एक वाघ समुद्रकिनाऱ्यावर काही फुग्यांसोबत खेळताना दिसत आहे
दुबईतील प्रसिद्ध हॉटेल ‘बुर्ज अल अरब’ समोर शूट केलेल्या व्हिडिओवरुन आता सोशल मीडियावर वादळ तयार झालं आहे. या व्हिडिओमध्ये वाघाच्या वापराबद्दल नेटिझन्स प्रचंड संतापले आहेत. हा व्हिडिओ lovindubai ने त्याच्या अधिकृत Instagram खात्यावर अपलोड केला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओत काय दाखवलं आहे की ज्यामुळे नेटकरी संतापत आहेत, ते पाहुया.( Viral Video Tiger used for baby gender reveal in Dubai netizens are fuming)
व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये एक वाघ समुद्रकिनाऱ्यावर काही फुग्यांसोबत खेळताना दिसत आहे, तर त्याच्या मागे दुबईतील प्रसिद्ध हॉटेल ‘बुर्ज अल अरब’ दिसत आहे. ‘लव्ह इन दुबई’ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर असं लिहिले आहे की, ‘दुबईमध्ये अशा प्रकारे आपली ओळख करुन दिली जाते.’ वाघांसारख्या जंगली प्राण्यांच्या वापरावर नेटकरी भडकले आहेत. वाघांकडून असे स्टंट करुन घेणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. आधी व्हिडीओ पाहा.
View this post on Instagram
एका युजरने लिहलं आहे की, अशा प्रकारचा मूर्खपणा ताबडतोब थांबला पाहिजे. त्याचवेळी दुसर्याने इन्स्टाग्राम काऊंटच्या अॅडमिनला प्रश्न विचारला आहे की, तुम्ही तुमच्या अकाऊंटवरुन असल्या फालतू गोष्टी काय प्रमोट करता? त्याच वेळी, अजून एकाने लिहिले आहे, यात गर्व करण्यासारखे काही नाही, ते पाळीव प्राणी नाही तर भयानक प्राणी आहे. अनेक वापरकर्ते सार्वजनिक ठिकाणी वन्य प्राणी आणणे कायदेशीर आहे का असा प्रश्न विचारत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, काही काळापूर्वी दुबई पोलिसांनी इशारा दिला होता की कोणत्याही वन्य प्राण्याला सार्वजनिक ठिकाणी नेणे हा अमिरातीच्या कायद्यांतर्गत गुन्हा मानला जाईल. त्यानंतर दुबई पोलिसांनी असेही म्हटले होते की, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पण काही लोक अजूनही सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी असे डावपेच अवलंबत आहेत.
हेही पाहा: