AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : बॅकअप घेण्याच्या प्रयत्नात ट्रॉली पडली नाल्यात.. लोक म्हणाले – ‘चीनमध्ये असे घडणे साहजीकच आहे ..

बॅकअप घेण्याच्या प्रयत्नात संपूर्ण ट्रॉली चक्क नाल्यात पडल्याचा एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चीनचा असल्याचे सांगितले जात आहे. अनेक लोकांनी याला शेअर केल्याने, हा व्हिडीओ पाहणाऱयाची संख्या लाखोंच्या घरात पोहचली आहे.

Viral Video : बॅकअप घेण्याच्या प्रयत्नात ट्रॉली पडली नाल्यात.. लोक म्हणाले - 'चीनमध्ये असे घडणे साहजीकच आहे ..
व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहणाऱयांला आपले हसू थांबविता येणे अशक्य Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 7:46 PM

वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा अपघात (Accident) होण्याची शक्यता आहे. हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण असे असूनही अनेकजण मनावर घेत नाहीत आणि वाहने घेऊन रस्त्यावर उतरतात(Down the street). विमान उडवल्याप्रमाणे कार चालविण्याचा शोकही अनेकांना महागात पडल्याचे यापूर्वी आपण पाहीले आहे. काही जण तर बाईक चालवताना मध्येच स्टंट दाखवू लागतात. हे खूप धोकादायक आहे, कारण हायस्पीड बाईकवरून पडल्यानंतर जिवंत राहण्याची शक्यताही कमी आहे. बरं, काही लोक यात खुप पटाईत असतात, त्यामुळे त्यांच्याकडून काही होत नाही, पण काही लोक इतके बेफाम ड्रायव्हर असतात की ते वाहने नीट मागेही वळवू शकत नाहीत आणि कुठेतरी धडकतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ड्रायव्हर ट्रॉली मागे घेण्याच्या प्रयत्नात संपूर्ण ट्रॉलीच नाल्यात टाकतो (The trolley is thrown into the nala). हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहणाऱयांला आपले हसू थांबविता येणे अशक्य आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की ड्रायव्हर कसा वेगवान ट्रॉली परत करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु नंतर जे घडते ते त्याला देखील आश्चर्यचकित करते. खरतर, त्याला गाडी एका मोठ्या नाल्यावर सिमेंटच्या फरशीवर पार्क करायची होती, पण ती जागा इतकी कमकुवत असेल याची कल्पना ड्रायव्हरला आली नाही, कारण गाडी उभी करताच फरशी तुटते आणि ड्रायव्हर गाडी सोबत नाल्यात पडतो. गाडीच्या ड्रायव्हरला काहीही झाले नाही हे सुदैव आहे , त्याला फक्त किरकोळ दुखापत झाली , अन्यथा तो ज्या पद्धतीने, नाल्यात पडला तर त्याला मोठी दुखापत होऊ शकली असती. .

हा व्हिडिओ चीनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मजेशीर व्हिडिओ hersey.dahil16 नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 3 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 6 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरचे म्हणणे आहे की, कारचे वजन जास्त होते, त्यामुळे ती उलटली, तर दुसर्‍या यूजरने ही कार चीनची आहे, त्यामुळे असे घडले असे लिहिले आहे. त्याचप्रमाणे आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘चीनमध्ये या घटना साधारण आहेत.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.