हातगाड्यावर मक्याचे कणीस विकणाऱ्या आजीची डोक्यालिटी, थेट माजी क्रिकेटपटूने घेतली दखल

एका 75 वर्षीय सेलवम्मा यांनी केलेला जुगाड हा चर्चेचा विषय बनतोय. त्या मक्याचे कणीस भाजण्यासाठी चक्क सौरऊर्जेचा वापर करत आहेत. (vvs laxman corn selling women)

हातगाड्यावर मक्याचे कणीस विकणाऱ्या आजीची डोक्यालिटी, थेट माजी क्रिकेटपटूने घेतली दखल
corn selling women
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 6:02 PM

बंगळुरु : असं म्हणतात की आपल्या देशात कोण काय करेल याचा काही नेम नाही. आपले काम सुकर करण्यासाठी अनेकजण वेगवगळे जुगाड वापरतात. सध्या अशाच एका 75 वर्षीय सेलवम्मा यांनी केलेला जुगाड हा चर्चेचा विषय बनतोय. त्या मक्याचे कणीस भाजताना हवा लागण्यासाठी चक्क सौरऊर्जेवर चालणाऱ्या फॅनचा वापर करत आहेत. अम्माच्या या डोक्यालिटीची दखल थेट माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने घेतली आहे. त्यांनी अम्माचा फोटो सोशल ट्विटरवर शेअर केला आहे. (VVS Laxman shares inspiring photos of 75 year old women on twitter who sells corn)

कर्मचाऱ्यांनी घेऊन दिला सौरऊर्जेवर चालणार फॅन

मिळालेल्या माहितीनुसार 75 वर्षीय वृद्ध सेलवम्मा बंगळुरु विधानसभेच्या बाहेर एका हातगाडीवर मक्याचे कणीस विकतात. या अम्मा रस्त्यावरच मक्याचे कणीस विकत असल्यामुळे त्यांच्या गाड्यासमोरुन अनेक कर्मचाऱ्यांची सतत ये-जा असते. अम्माला मक्याचे कणीस भाजण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आगीसाठी सतत हवा घालावी लागते हे या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर याच कर्मचाऱ्यांनी अम्माला सौरउर्जेवर चालणारा पंखा भेट दिला. ही भेट मिळाल्यापासून अम्मा खूप आनंदी आहेत.

थेट व्हीव्हीएस लक्ष्मणकडून दखल

मक्याचे कणीस भाजण्याच्या या अनोख्या आयडियामुळे आतापर्यंत अनेकांनी अम्माचे कौतूक केलेले आहे. यावेळी थेट माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने अम्माची दखल घेतलीये. लक्ष्मणने अम्माचा मक्याचे कणीस भाजतानाचा फोटो ट्विटरवर टाकलाय . या फोटोसोबत समपर्क कॅप्शनसुद्धा दिले आहे. “मक्याचे कणीस भाजण्यासाठी बंगळुरुमधील एक 75 वर्षीय सेलवम्मा हाईटेक असलेल्या सोलार फॅनचा उपयोग करते. आजकाल तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक काम सोपे होत आहेत,” असे व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटलंय.

दरम्यान, सेलवम्माचा हा फोटो क्रिकेटपटू व्हिव्हिएस लक्ष्मणने सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर त्याच चांगलीच दखल नेटकऱ्यांनी घेतलीये. या अम्माचे सर्व स्तरातून स्वागत तर केले जातच आहे, पण अम्माच्या या डोक्यालीटीचे विशेष कौतूक होतेय .

इतर बातम्या :

धक्कादायक ! शीतपेय दिले नाही म्हणून गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल

हे फक्त हात नाहीत, जगण्याची आशा आहेत, महामारीतलं काळीज चिरणारं वास्तव

VIDEO : लहान मुलांमध्ये तुफान हाणामारी, तुम्ही देशी WWE बघितलं का?, बघितल्यावर पोट धरुन हसाल

(VVS Laxman shares inspiring photos of 75 year old women on twitter who sells corn)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.