AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | लाडक्या माहूताच्या निधनाने हत्तीलाही शोक, पार्थिवासमोर सोंडेने अखेरचा निरोप, पाहा हृदयद्रावक व्हिडीओ

ओमानचेत्तन यांच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली, तसंच त्यांच्या हत्तींनाही शोक अनावर झाला (Elephant bidding farewell to Mahout)

VIDEO | लाडक्या माहूताच्या निधनाने हत्तीलाही शोक, पार्थिवासमोर सोंडेने अखेरचा निरोप, पाहा हृदयद्रावक व्हिडीओ
हत्तीची माहूताला मानवंदना
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 3:05 PM

तिरुअनंतपुरम : मालकाच्या निधनानंतर सैरभैर झालेले पाळीव प्राणी आपण पाहिले आहेत. लाडक्या माहूताच्या निधनानंतर त्याला अखेरचा निरोप देणाऱ्या हत्तीचा हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे. कर्करोगाशी झुंजताना प्राण गमावलेल्या माहूताच्या पार्थिवासमोर हत्तीने सोंडेने मानवंदना दिली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (Watch Heartwarming Video of an Elephant bidding farewell to Mahout in Kerala)

सहा दशकांपासून हत्तींचा सांभाळ

केरळमधील कोट्टायममध्ये (Kottayam) ही मन हेलावून टाकणारी घडना घडली. कुण्णक्कड दामोदरन नायर (Kunnakkad Damodaran Nair) यांना प्रेमाने ओमानचेत्तन (Omanachettan) म्हटलं जात असे. हत्तींवर ते लेकरांप्रमाणे प्रेम करत असत. जवळपास सहा दशकांपासून ते विविध हत्तींचा सांभाळ करत होते. 3 जून रोजी ओमानचेत्तन यांनी अखेरचा श्वास घेतला. कॅन्सरशी लढताना वयाच्या 74 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

ओमानचेत्तन यांचे कर्करोगाने निधन

ओमानचेत्तन यांच्या निधनाने नायर कुटुंबावर शोककळा पसरली. जितकं दुःख नायर परिवाराला झालं, तितकाच ओमानचेत्तन यांच्या कुटुंबातील हत्तींनाही शोक अनावर झाला. पल्लट ब्रह्मदातन (Pallat Brahmadathan) या हत्तीला आपल्या पितृतुल्य माहूताच्या निधनाचं अतीव दुःख झाल्याचं उपस्थित सांगतात.

पार्थिवासमोर सोंड उंचावून अखेरचा निरोप

ओमानचेत्तन यांच्या निधनाचं वृत्त समजल्यावर पल्लट ब्रह्मदातन या हत्तीचे मालक त्याला घेऊन अंत्यदर्शनासाठी आले. यावेळी माहूताच्या पार्थिवासमोर सोंड उंचावून हत्तीने अखेरचा सलाम केला. त्यानंतर तो अक्षरशः नतमस्तक झाला. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या हृदयातही कालवाकालव झाली. अंत्यसंस्कारांना उपस्थित असलेल्या एकाने हा व्हिडीओ शूट केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला, तसे नेटिझन्सच्याही डोळ्यात अश्रू तरळले. (Elephant bidding farewell to Mahout)

केरळातील सणांमध्ये गाजलेली जोडी

केरळातील महत्त्वाच्या सण समांरभांवेळी ब्रह्मदातन आणि ओमानचेत्तन या हत्ती-माहूताची जोडी नेहमी उपस्थित राहत असे. थ्रिसूर पूरमच्या वेळी ही जोडगोळी अखेरची दिसली होती.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | हत्तीला पाहून वाघाने ठोकली धूम; लोक म्हणाले, कळले ना जंगलचा राजा कोण!

VIDEO: रस्त्यात मधोमध हत्तीला पाहून स्कूटीवरून पडला तरुण, नंतर जे काही झालं ते तुम्हीच पाहा

(Watch Heartwarming Video of an Elephant bidding farewell to Mahout in Kerala)

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.