Video | खायचा कांदा, डोळ्यातना पाणी येऊ न देण्याचा वांदा, स्पेनमधील अजब स्पर्धेची गजब गोष्ट!
Spain : No Tear Fest : ल्या अनेक वर्षांपासून स्पेनमध्ये या स्पर्धेची परंपरा सुरु आहे. विशेष म्हणजे एकदा जो या स्पर्धेत भाग घेऊन जातो, तो पुन्हा पुन्हा या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आवर्जून येत असल्याचंही पाहायला मिळालंय.
स्पेन : स्पेन (Spain) हा देश ओळखला जातो तो आपल्या वेगवेगळ्या आणि वैशिट्यपूर्ण अशा स्पर्धांसाठी. तुम्ही जर जिंन्दगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा पाहिला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की स्वतःच्या पाठीमागे गवे लावून घेणं, म्हणजे नेमकं काय असते ते? पण ही काही स्पेनमधील एकच स्पर्धा नाही. अशाच अजब आणि विचित्र अशा अनेक स्पर्धा स्पेनमध्ये वारंवार भरवल्या जातात. त्यापैकी एक अनोखी स्पर्था आहे, नो टीअर फेस्ट (No Tear Fest). अर्थात मराठीत याला तुम्ही एकही अश्रू न ढाळण्याची स्पर्धा म्हणू शकता. पण मुळात तसा त्याचा अर्थ घेणं चुकीचं ठरेल. कारण या स्पर्धेमध्ये डोळ्यातला पाणी न काढता कांदा खाऊन दाखवावा लागतो. आता तुम्ही म्हणाल, की कांदा काय, कुणीही खाऊन दाखवू शकेल. करेक्ट आहे! कांदा कुणीही खाऊन दाखवू शकतंच. पण या स्पर्धेत एक कांदा नसतो खायचा. तर पोट भरेपर्यंत कांदे खात राहायचे असतात. जो सगळ्यात जास्त कांदे खाणार, तो जिंकणार, असं या स्पर्धेचं स्वरुप आहे. स्पेनमधील या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अनेकजण जगभरातून हजेरी लावत असतात. नुकतीस ही स्पर्धा पार पाडली. मोठ्या संख्येनं स्पर्धक कांदा खाण्याच्या या स्पर्धेत सहभागी झाले होते.
थाटामाटात आयोजन…
स्पर्धा कांदा खाण्याची जरी असली, तरी तिचं आयोजन मात्र एकदम जंगी असतं. गेल्या अनेक वर्षांपासून स्पेनमध्ये या स्पर्धेची परंपरा सुरु आहे. विशेष म्हणजे एकदा जो या स्पर्धेत भाग घेऊन जातो, तो पुन्हा पुन्हा या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आवर्जून येत असल्याचंही पाहायला मिळालंय. स्पेनमधील कालकोटडामध्ये या स्पर्धेचं उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं.
या स्पर्धेचं आयोजन थाटामाटत केलं जातं. तितक्यात जोमात आणि जल्लोषात स्पर्धकांचं स्वागत होते. मोठ्या प्रमाणात कांदा, कांद्याची पात इथं आणली जाते. ती चुलीवर जशी भाकरी भाजतात, तशी भाजली जाते. त्यासाठी लाकडी काठ्यांचीही बंदोबस्त केलेला असतो. यानंतर अर्धा कच्चा शिजवलेला कांदा स्पर्धकांना खायला दिला जातो. जो सर्वात जास्त कांदे खाणार तो या स्पर्धेचा विजेचा म्हणून घोषित केला जातो.
कुणी जिंकली स्पर्धा?
Ruptly या वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार यंदाही ही स्पर्धा डेव्हिड मार्टिननं जिंकली आहे. डेव्हिडने तब्बल 192 कांदे फस्त केले असून यंदाचं हे त्याचं या स्पर्धेत सहभागी होण्याचं दुसरं वर्ष होतं. दोन वर्षांपूर्वी डेव्हिडनं या स्पर्धेत दुसरा नंबर पटकावला होता. मात्र यंदा त्यानं बाजी मारत एक नंबर कामगिरी केली असून सर्वाधिक कांदे फस्त करण्याचा मान मिळवला आहे.
पाहा व्हिडीओ –
No Tear Fest | Onion eating contest held at Calcotada Festival in Valls #Spain pic.twitter.com/YCK3aH3IwV
— RT (@RT_com) January 26, 2022
संबंधित बातम्या :
6 देशांत रहा, व्यवसाय करा आणि 20 लाख मिळवा, तुमच्यासाठी भन्नाट ऑफर
Mumbai cold : मुंबई गारठली, नेटकरी म्हणाले आता बर्फ पडणार वाटतं, वाचा सोशल मीडियावरील भन्नाट मीम्स