Wedding Dance Video : नवरी अन् तिच्या 6 मैत्रिणींचा ‘सिंड्रेला’ डान्स, पाहून प्रेमात पडाल…
हा व्हीडिओ theweddingbrigade नावाच्या इन्स्टाग्म अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.
मुंबई : यंदाच्या लग्ना सिझनमध्ये सर्वाधिक चलती आहे सोशल मीडियाची … कारण लग्नातील छोटे-मोठे व्हीडिओ (Wedding viral video) सध्या सोशल मीडियावर शेअर केले जातात. अश्या व्हीडिओंना चांगली पसंतीही मिळताना दिसते. डान्स व्हीडिओंना तर विशेष पसंती मिळताना दिसते. सध्या असाच एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात नवरी मुलगी डान्स कराताना दिसतेय तिच्यासोबत तिच्या सहा मैत्रिणीही पाहायला मिळत आहेत. हा व्हीडिओ (viral video) सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल व्हीडिओ
एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात नवरी मुलगी डान्स कराताना दिसतेय तिच्यासोबत तिच्या सहा मैत्रिणीही पाहायला मिळत आहेत. हा व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हीडिओत वधू आणि तिच्या मैत्रिणींनी पलक तिवारीच्या ‘बिजली’ गाण्यावर डान्स करत आहेत. हा डान्स एवढा भारी आहे की हा व्हीडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल. वधू आणि तिच्या 6 मैत्रिणी बँक्वेट हॉलमध्ये डान्स स्टेजमध्ये प्रवेश करतात. यानंतर सर्वजण नाचू लागतात. हा व्हीडिओ theweddingbrigade नावाच्या इन्स्टाग्म अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.
View this post on Instagram
लग्नातील डान्सचा असाच एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात नवरीचा डान्स पाहायला मिळत आहे. या व्हीडिओमध्ये तिच्या एंट्रीच्या वेळी नववधूने केलेला डान्स पाहून लोक फिदा झालेत. ही नववधू ‘मधनिया’या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. वधूच्या डान्सने उपस्थितांना भुरळ घातली. तिने घातलेला ड्रेस अन् तिच्या अदा यामुळे लोक तिच्या या डान्सला अधिक पसंती देत आहे. साधा सरळ अन् तरिही मनाला भूरळ घालणारा आहे. तिची निरागसता अनेकांना आकर्षत करतेय.
View this post on Instagram