कंडोमचा वापर भारतात असाही होऊ शकतो, याची कंडोम निर्माण करणाऱ्यानेही कल्पना केली नसेल..!

पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमधील काही मुलं कंडोमची नशा करत असल्याचे वृत्त आता वाऱ्यासारखे पसरले आहे. दुर्गापूरमधील काहीजण सांगत आहेत की, काही मुलं या नशेच्या आधीन गेली आहेत.

कंडोमचा वापर भारतात असाही होऊ शकतो, याची कंडोम निर्माण करणाऱ्यानेही कल्पना केली नसेल..!
कंडोमची नशा
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 3:43 PM

नवी मुंबईः माणसांना कधी, कुठले व्यसन लागेल सांगता येत नाही, दारू, सिगारेट, तंबाखू अशा व्यसनांकडे माणसं सहजतेच्या नजरेनं पाहतात. पण कधी टूथपेस्ट, कधी शाही तर व्हायटरही नशेसाठी वापरली जातात हे ऐकून त्या त्या काळी अनेकांना अजब वाटत होतं, असच अजब वाटण्यासारखं आताही एक व्यसन पश्चिम बंगालमधील पोरांना लागलं नाही. म्हणजे ज्यावेळी भारतात कंडोम आला असेल त्यावेळी कंडोमकडे बघण्याची दृष्टू किती वेगळी होती असेल, तर आता पश्चिम बंगालमधील घटनेने कंडोमचा (condoms) वापर यासाठी असाही होऊ शकतो याची कंडोम निर्माण करणाऱ्यानेही कल्पना केली नसेल अशीच परिस्थिती आता पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमधील (West Bengal, Durgapur) आहे. दुर्गापूरमधील पोरांना आता कंडोमची वाफ घेण्याचे व्यसन (Addiction) लागले आहे, त्यामुळे झालय असं की आता तिथे कंडोम मिळणंही मुश्किल झालं आहे.

पोरं नशेच्या आधीन

पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमधील काही मुलं कंडोमची नशा करत असल्याचे वृत्त आता वाऱ्यासारखे पसरले आहे. दुर्गापूरमधील काहीजण सांगत आहेत की, काही मुलं या नशेच्या आधीन गेली आहेत. मागील काही दिवसांपासून दुर्गापूरमधील सिटी सेंटर, बिधाननगर, बेनाचिती आणि मुचिपारामध्ये प्लेवर असणाऱ्या कंडोमची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत, मात्र या व्यसनामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

कंडोममध्ये सुगंधी संयुगे

माध्यमांतील वृत्तानुसार एका दुकानदाराने आपल्या रोजच्या गिऱ्हाईकाला एक दिवस विचारले की, एवढ्या कंडोम खरेदी का करतो आहेस तर त्यावर त्या गिऱ्हाईकाने दिलेले उत्तर धक्कादायक होते, त्याने सांगितले की, हे कंडोम मी घेतो ते नशा करण्यासाठी. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एक जर्नलने एक अहवाल छापला होता, त्यामध्ये लिहिले होते,कंडोममध्ये सुगंधी संयुगे असतात. ही संयुगे (अॅरोमेटिक) तुटून अल्कोहोल तयार होतात, आणि ती व्यसनाधीन असतात. अशी संयुगे इतर अनेक गोष्टींमध्येही आढळतात. उदाहरणार्थ, डेंड्राइट ग्लूमध्येही असू शकतात.

दारुसारखी नशा

मेडिसन जर्नलमध्ये छापण्यात आले होते की, गरम पाण्यात जर जास्त वेळ कंडोम ठेवला गेला तर त्यातील संयुगे तुटून जातात, आणि ती दारूसारखी बनतात, आणि त्याचा वापर व्यसनासारखा केला जातो. कंडोमच्या या व्यसनामुळे पश्चिम बंगालमधील मेडिकल दुकानदाराने सांगितले की, या आधी तीन किंवा चार कंडोमची पाकिटे घेतली जात होती, मात्र आता दुकानातून कंडोमच गायब होत आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.

 या नशेमुळे पालक चिंताग्रस्त

याआधीही टूथपेस्ट आणि शाहीपासून नशा केली जाते अशाही बातम्या आल्या होत्या. नायजेरियामध्ये याची विक्री वाढून सहा टक्क्यापर्यंत गेली होती. मात्र पश्चिम बंगालमधील नागरिक कंडोमच्या या नशेमुळे आता चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. मेडिकल दुकानदार सांगतात की, या व्यसनाच्या विळख्यात आता युवावर्ग सापडला आहे, त्यांची संख्याही प्रचंड मोठी आहे, मात्र याबाबत तेथील प्रशासनाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली गेली नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.