पिवळ्या सिग्नलचा हा नियम पाळला नाही तर फाडावी लागते पावती
हा सिग्नल सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. जर तो पाळला गेला नाही तर प्रसंगी आपल्याला पावती फाडावी लागू शकते.
कोणत्याही देशाचा विकास हा तेथील रस्त्यांच्या विकासाशी निगडित असतो, असे नेहमी म्हटले जाते. भारतातही रस्त्यांचे जाळे झपाट्याने वाढवले जात आहे. रस्त्यांवरून चालत असाल तर त्यासंबंधी आवश्यक नियमांचंही पालन करावं लागतं. यामुळे रस्ते अपघात टाळता येऊ शकतात. पण सर्व नियम आणि प्रयत्नांनंतरही रस्ते अपघातांच्या बातम्या वर्तमानपत्रात येतात. आम्ही तुम्हाला रस्त्यांशी संबंधित असे काही नियम सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या अपघाताची शक्यता कमी होईल तसेच तुमचे हजारो चलनही वाचतील.
देशात कुठेही ट्रॅफिक सिग्नलमध्ये लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन प्रकारचे दिवे लावले जातात. ज्याचा अर्थ थांबा, पहा आणि पुढे चाला.
लाल सिग्नल असतानाही गाडी चालवल्याने चालान कापले जाते हे तुम्हाला माहिती असेलच, पण काही लोक पिवळ्या सिग्नलबाबत थोडे गोंधळलेले दिसतात.
आपल्याला लाल सिग्नलचा अर्थ माहित आहे. हिरव्याचा अर्थ सुद्धा आपण जाणतो. पिवळ्या सिग्नलच काय? हा सिग्नल सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. जर तो पाळला गेला नाही तर प्रसंगी आपल्याला पावती फाडावी लागू शकते.
पिवळा सिग्नल एखाद्या इशाऱ्या प्रमाणे काम करतो. लाल सिग्नल पडण्याआधी वाहने थांबविण्याची तयारी हा पिवळा सिग्नल करत असतो. जसा पिवळा प्रकाश दिसतो गाडीचं स्पीड कमी करायचं असतं.