102 वर्षाच्या माणसाने वरात काढून सांगितलं, ”अरे तुझा मामा अजून जिंवत आहे, पेन्शन का बंद केली”

पेंशनच्या या भोंगळ कारभाराला कंटाळून दादाजींनी नामी शक्कल लढवत आपण जीवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी पैशांच्या नोटांचा हार घालून रोहतक शहरामधून त्यांनी स्वतःची वरात काढून घेतली, आणि राज्य सरकारकडे आपली पेन्शन पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.

102 वर्षाच्या माणसाने वरात काढून सांगितलं, ''अरे तुझा मामा अजून जिंवत आहे, पेन्शन का बंद केली''
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 12:57 PM

नवी दिल्लीः काही दिवसांपूर्वी कागज नावाचा चित्रपट आला होता, त्यामध्ये एकजण स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी कितीतरी प्रयत्न करत असतो, तसाच एक प्रकार सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे. 102 वर्षाच्या दादाजी यांना पेंशन मिळत नव्हती, इतक्या वर्षानंतरही आपल्या पेंशन (Pension) मिळत नाही, म्हणून रागाने येथील दादाजीनी एक नामी शक्कल लढवली, ते नामी शक्कल बघून अनेक जणांना धक्का बसला आहे. ही घटना आहे हरियाणातील रोहतकच्या जिल्ह्यामधील. दुली चंद नावाच्या व्यक्तीने आपण जीवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी रथात बसून आपली स्वतःचीच वरात काढली आहे. दादाजीनी ही वरात फक्त आपल्यासाठी काढली नाही तर प्रशासनातील अधिकाऱ्यांपर्यंत आपली वरात ते घेऊन गेले होते.

त्यांनी काढलेल्या या वरातीत परिसरातील अनेक व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, आणि रथावर लावलेल्या पोस्टरवर थारा फुफा जिंदा है असं ठळक अक्षरात लिहिण्यात आले होते.

व्हिडीओची जोरदार चर्चा

सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची प्रचंड चर्चा होऊ लागली आहे, आणि हा व्हिडीओ अनेक जणांनी आपल्या प्रोफाईलवर शेअरही केला आहे.

थारा फुफा जिंदा है

थारा फुफा जिंदा है असं पोस्टर्स लावून वरात काढून घ्यायची वेळी दादाजीवर आली ती म्हणजे प्रशासनातील बोंगळ काराभारामुळे. रोहतक जिल्ह्यातील गांधरामधील दुली चंद यांना सरकारी कागदोपत्री त्यांना मृत घोषित केले होते. कागदोपत्री ते मृत झाल्यामुळे मार्च महिन्यापासून त्यांची पेंशन बंद करण्यात आली.

प्रशासनाचा भोंगळ कारभार

पेंशनच्या या भोंगळ कारभाराला कंटाळून दादाजींनी नामी शक्कल लढवत आपण जीवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी पैशांच्या नोटांचा हार घालून रोहतक शहरामधून त्यांनी स्वतःची वरात काढून घेतली, आणि राज्य सरकारकडे आपली पेन्शन पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

रोहतकमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडिवरील अनेकांकडून हा व्हिडीओ प्रोफाईलवर शेअर केला आहे. तर अनेक जणांनी ते 102 वर्षाच्या दादाजींनी मात्र अनेक जणांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.