मै लिंक नही खोलूंगा…! नागपूर पोलिसांच्या क्रीएटीव्हीटीला तोड नाय, पुष्पाचा फोटो शेअर करत काय म्हणाले बघा
सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटाने लोकांना वेड लावले आहे. इतकेच नव्हेतर चित्रपटातील गाणे ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’यावर तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही स्वत: ला डान्स करण्यापासून रोखू शकत नाहीये.
मुंबई : सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटाने लोकांना वेड लावले आहे. इतकेच नव्हेतर चित्रपटातील गाणे ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’यावर तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही स्वत: ला डान्स करण्यापासून रोखू शकत नाहीये. पुष्पा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तेंव्हापासून प्रत्येकजण या चित्रपटाचा फॅन झाले आहे. चित्रपटातील डॉयलॉग देखील प्रत्येकाच्या ओठ्यांवर आहेत.
ऑनलाइन फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी खास संदेश
पुष्पा चित्रपटातील अनेक डॉयलॉग लोकांना प्रचंड आवडत आहेत. पण असा एक डायलॉग आहे, जो लोकांच्या ओठ्यांवर जास्त आहे. आता थेट ऑनलाइन फसवणुकीबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी नागपूर पोलिसांनी पुष्पा चित्रपटातील डॉयलॉगचा वापर केला आहे. आजकाल प्रत्येकजण सहजपणे ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरतो आहे. अशा परिस्थितीत नागपूर पोलिसांनी लोकांना जागरूक करण्यासाठी पुष्पा चित्रपटाचा एक मीम शेअर केला आहे. अल्लू अर्जुनच्या या व्हायरल डायलॉगचा वापर करून नागपूर पोलिसांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या क्लिक ओपन करू नका असा संदेश लोकांना दिला आहे.
इथे पाहा नागपूर पोलिसांचे ट्विट
That moment when you receive a FREE BUMPER PRIZE link on your WhatsApp :
Be the #PushparajOfCyberSafety @alluarjun #DoNotClickThem pic.twitter.com/7wJxW2JjIJ
— Nagpur City Police (@NagpurPolice) February 11, 2022
नागपूर पोलिसांच्या या क्रिएटिव्हचे सोशल मीडियावर काैतुक केले जात आहे. एका यूजरने लिहिले की, ‘नागपूर पोलिसांचे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला फॉलोअर समजले का? आग आहे..! दुसर्या यूजरने लिहिले की, ‘खरोखर लोकांना पटवण्याचा हा सर्वोत्तम आणि सर्वात चांगला मार्ग आहे. ‘आणखी एका युजरने लिहिले की, मला नागपूर पोलिसांची ही खास शैली खूप प्रचंड आवडली आहे. याशिवाय अनेकांनी ही पोस्ट पाहिली आणि नागपूर पोलिसांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले.
संबंधित बातम्या :
VIDEO : डान्समध्ये स्टंट दाखवणे मुलांना पडले महागात, पाहा खतरनाक व्हिडीओ!