भेटा Anand Mahindra यांच्या पत्नीला, स्वतः आहेत बिझनेस वुमन; अशी झाली होती भेट!
आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. जनता आणि पर्यावरणाशी निगडीत समस्यांचे निदान करण्यासाठी ते अनेकदा पुढे येतात. अनेक वेळा भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठीही ते ओळखले जातात.
आनंद महिंद्रा हे जगभरातील प्रसिद्ध भारतीय उद्योगपतींपैकी एक आहेत. आपल्या ज्ञानी, प्रेरणादायी आणि व्हायरल ट्विट्ससाठी ओळखले जाणारे हे भारतीय अब्जाधीश महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आहेत. आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. जनता आणि पर्यावरणाशी निगडीत समस्यांचे निदान करण्यासाठी ते अनेकदा पुढे येतात. अनेक वेळा भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठीही ते ओळखले जातात. पण आनंद महिंद्रा यांना पाठिंबा देणाऱ्या अनुराधा महिंद्रा यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
कोण आहेत आनंद महिंद्रा यांच्या पत्नी?
अनुराधा महिंद्रा या लक्झरी लाइफस्टाइल मॅगझिन Verve च्या संस्थापक आहेत. त्या मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या आहेत. अनुराधा महिंद्रा ‘मेन्स वर्ल्ड’ मासिकाच्या सह संस्थापकही आहेत. अनुराधा महिंद्रा यांनी मुंबईतील सोफिया कॉलेजमधून पदवी घेतली आणि त्यानंतर त्यांची भेट आनंद महिंद्रा यांच्याशी झाली. आनंद इंदूरमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी स्टुडंट फिल्म बनवत होते तेव्हा त्यांची भेट १७ वर्षीय अनुराधा या मानसशास्त्राच्या विद्यार्थिनीशी झाली.
आनंद महिंद्रा यांनी असा केला प्रस्ताव
दोघेही प्रेमात पडले आणि नंतर आनंदने अनुराधाला त्यांच्या आजीची अंगठी देऊन एकदम रोमँटिक अंदाजात प्रपोज केले. अंगठी असा एकच दागिना आहे जो अनुराधा यांना आवडतो. अंगठीला ती आपला आवडता ज्वेलर पीस मानते. अनुराधाशी लग्न करण्यासाठी आनंदने एक सेमिस्टर सुट्टी घेतली आणि नंतर हे जोडपे अमेरिकेत गेले. अमेरिकेत अनुराधा यांनी बोस्टन विद्यापीठातून कम्युनिकेशनची पदवी मिळवली.
गेली अनेक वर्षे त्यांनी पत्रकार आणि प्रकाशक म्हणून काम केले आहे. त्या लोकप्रिय रोलिंग स्टोन्स इंडिया प्रकाशनाच्या मुख्य संपादक देखील आहेत. रिकाम्या वेळेत अनुराधा यांना वाचनाची आवड असून हारुकी मुराकामी, गॅब्रिएल गार्सिया मार्केझ आणि व्ही.एस नायपॉल हे तिचे आवडते लेखक आहेत.