तिला होणार बाळं त्याला पप्पा म्हणणार की दादा? नवऱ्याला घटस्फोट देऊन स्वत:च्या मुलासोबतच… हे काय करुन बसलेय ही बाई
2007 मध्ये अलेक्सीशी लग्न केल्यानंतर तिची व्लादिमीरशी भेट झाली. त्यावेळी व्लादिमीर फक्त 7 वर्षांचा होता. तेव्हा ती त्याची सावत्र आई होती. लग्नाच्या 10 वर्षानंतर, मरीनाने अलेक्सीपासून घटस्फोट घेतला. काही काळानंतर मरीना व्लादिमीरच्या प्रेमात पडली आणि नंतर घटस्फोटाच्या 3 वर्षानंतर तिने सावत्र मुलगा व्लादिमीरशी लग्न केले.
नवी दिल्ली : बऱ्याचदा नातेसंबंधांमध्ये विचित्र जोड्या पाहायला मिळतात. न कळतपणे काही जण स्वतःच्या भावाशी, बहिणीशी इतकच काय तर वडिलांशी विवाह झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रशियातही(Russia) अशीच एक विचित्र घटना घडली आहे. नवऱ्याला घटस्फोट देऊन एका महिलेने तिच्या सावत्र मुलासह(stepson’s) लग्न केले आहे. आता ही महिला गरोदर आहे. तिला तिच्या सावत्र मुलापासून बाळ होणार आहे. त्यामुळे होणार बाळ त्याच्या वडिलांना पप्पा म्हणणार की दादा असा प्रश्न निर्माण झाला आहे. या जोडप्याची सोशल मीडियावर चांगले चर्चा रंगली आहे. मरिना बालमाशेवा(Marina Balmasheva) असे या महिलेचे नाव आहे.
दोन वर्षांपूर्वी केले सावत्र मुलाशी लग्न
‘द मिरर’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. रशियामध्ये राहणारी 37 वर्षीय मरिना बालमाशेवाने तिच्या सावत्र मुलासोबतच लग्न केले आहे. मरिना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. 2 वर्षांपूर्वी तिने सावत्र मुलासह दुसरे लग्न केले. यानंतर ती चर्चेत आली. मरिनाने तिचा 23 वर्षांचा सावत्र मुलगा व्लादिमीर शॅवरिनसह लग्न केले आहे. मरिनाने तिचा पती अलेक्सी शाव्हरिनपासून घटस्फोट घेतला. यानंतर ती तिचा सावत्र मुलगा व्लादिमीरच्या प्रेमात पडली. काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
10 वर्षांनंतर पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला
2007 मध्ये अलेक्सीशी लग्न केल्यानंतर तिची व्लादिमीरशी भेट झाली. त्यावेळी व्लादिमीर फक्त 7 वर्षांचा होता. तेव्हा ती त्याची सावत्र आई होती. लग्नाच्या 10 वर्षानंतर, मरीनाने अलेक्सीपासून घटस्फोट घेतला. काही काळानंतर मरीना व्लादिमीरच्या प्रेमात पडली आणि नंतर घटस्फोटाच्या 3 वर्षानंतर तिने सावत्र मुलगा व्लादिमीरशी लग्न केले.
दुसऱ्या लग्नानंतर वजन कमी होते
मरीना म्हणते की व्लादिमीरशी लग्नाच्या वेळी तिचे वजन जास्त होते. व्लादिमीरच्या म्हणण्यानुसार तिने स्वतःला फिट आणि फाईन करण्यासाठी वजन कमी करण्यास सुरुवात केली. वजन कमी केल्यानंतर स्वतःला आकर्षक दिसण्यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी देखील केली. इंस्टाग्रामवर मरिनाचे सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिचा दुसरा नवरा आणि सावत्र मुलगा व्लादिमीरसोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर तिच्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती दिली आहे.