शहिदांना श्रद्धांजली देताना भावाचं नाव पाहून कोसळलं रडू, National War Memorialमधला Video viral
National War Memorial : दिल्लीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही भावुक व्हाल. येथील शहीद जवानांच्या नावांमध्ये तिचा भाऊ कॅप्टन केडी संब्याल (Captain KD Sambyal) यांचे नाव पाहून एक महिला रडते (Crying) आहे.
National War Memorial : दिल्लीतील नॅशनल वॉर मेमोरियलशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही भावुक व्हाल. व्हिडिओमध्ये येथील शहीद जवानांच्या नावांमध्ये तिचा भाऊ कॅप्टन केडी संब्याल (Captain KD Sambyal) यांचे नाव पाहून एक महिला रडते (Crying) आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसतात. ही महिला आपल्या पतीसोबत राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देण्यासाठी आली होती. मात्र शहीद जवानांच्या नावांमध्ये तिच्या भावाचे नाव पाहून ती स्वत:ला रोखू शकली नाही. महिलेचा भाऊ कॅप्टन केडी संब्याल हा 193 फील्ड रेजिमेंटचा भाग होता. त्याची तैनाती सांबा, जम्मू-काश्मीरमध्ये होती. शगुन असे या महिलेचे नाव असून तिच्या पतीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आज अचानक आम्ही दिल्लीला जाण्याचा प्लॅन केला. कॅनॉट प्लेसला भेट दिल्यानंतर मी माझ्या पत्नीला सांगितले की चला नॅशनल वॉर मेमोरियलला जाऊ या.
रोखू शकली नाही अश्रू
शगुनचा नवरा पुढे सांगतो, की, ते स्मारकाच्या भिंतींवर सुवर्ण अक्षरात लिहिलेले कॅप्टन विक्रम बत्रा आणि मेजर अजय सिंग जसरोटिया यांचे फोटो काढत असताना त्यांच्या नावाच्या मधोमध त्यांच्या पत्नीला त्यांचा भाऊ कॅप्टन केडी संब्याल यांचे नाव दिसले. त्यानंतर शगुन स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
इन्स्टाग्रामवर शेअर
शगुनच्या पतीने सांगितले, की जेव्हा त्यांच्या पत्नीने तिच्या भावाचे नाव स्मारकावर पाहिले तेव्हा तिने लगेच मला हाक मारली. मग म्हणाले, हे बघ भावाचे नाव आहे. इन्स्टाग्रामवर त्याने लिहिले आहे, की शगुनला याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्याच्या घरच्यांनाही याबाबत काहीच माहिती नव्हती. शगुनचा नवरा सांगतो, की हा क्षण पाहून तोही स्वत:ला रोखू शकला नाही आणि खूप भावुक झाला. हा व्हिडिओ सुमारे दीड लाख वेळा पाहिला गेला आहे. याशिवाय या व्हिडिओला 11 लाख 35 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. त्याचबरोबर हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram