Viral : व्यवसाय तो ही मिठी मारण्याचा! Cuddle Therapistची ही अनोखी कहाणी; जाणून घ्या, किती कमाई करते…

Cuddle Therapist Story : अनोळखी व्यक्तींना मिठी मारणे, त्रस्त लोकांचे सांत्वन करणे, हा देखील एक व्यवसाय असू शकतो का? प्रथमदर्शनी तुमचे उत्तर नाही असेच असेल. पण ब्रिटनच्या क्रिस्टीना लिंक(Kristiina Link)ने याला आपला व्यवसाय बनवला आहे. यातून ती लाखो रुपये कमवत (Earning Money) आहे.

Viral : व्यवसाय तो ही मिठी मारण्याचा! Cuddle Therapistची ही अनोखी कहाणी; जाणून घ्या, किती कमाई करते...
क्रिस्टीना लिंक (सौ. इन्स्टग्राम)
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 5:06 PM

Cuddle Therapist Story : अनोळखी व्यक्तींना मिठी मारणे, त्रस्त लोकांचे सांत्वन करणे, हा देखील एक व्यवसाय असू शकतो का? प्रथमदर्शनी तुमचे उत्तर नाही असेच असेल. पण ब्रिटनच्या क्रिस्टीना लिंक(Kristiina Link)ने याला आपला व्यवसाय बनवला आहे. या नोकरीतून ती वर्षभरात लाखो रुपये कमवत (Earning Money) आहे. क्रिस्टीना स्वतःला कडल थेरपिस्ट (Cuddle Therapist) म्हणवते. एका वृत्तानुसार, पूर्व लंडनच्या स्ट्रॅटफोर्ड येथे राहणारी 30 वर्षीय क्रिस्टीना लिंक दुःखी, उदास किंवा एकाकी असलेल्या अनोळखी लोकांना सांत्वन देते. क्रिस्टिना तिच्या एका सत्रातून 17 हजार रुपये कमावते. ती तिच्या ग्राहकांना फक्त भावनिक आधार देते. लोक अनेकदा तिच्या या कार्याबद्दल चुकीचा समज करून घेतात. परंतु असे काहीही नाही. ती हे सर्व समाधानाच्या भावनेने करते.

प्रियकरही समजून घेतो गरजा

तिच्या सेवांमध्ये ग्राहकाचा हात धरणे, त्याचे केसांना कुरवाळणे आणि मिठी मारणे समाविष्ट आहे. क्रिस्टीना तिच्या प्रत्येक ग्राहकासोबत 1 ते 3 तास घालवते. या दरम्यान, ती त्याला मानसिक आधार आणि धैर्य देण्याचा प्रयत्न करते. त्या बदल्यात लोक तिला पैसे देतात. थेरपिस्ट क्रिस्टीना म्हणतात, की या कामाचे अनेक भावनिक फायदे आहेत. क्रिस्टीनाचा प्रियकरही तिच्या व्यावसायिक गरजा समजून घेतो. 2019मध्ये त्यांनी हा विचित्र व्यवसाय सुरू केला. त्यावेळी क्रिस्टीनाच्या आयुष्यात प्रेम आणि आपुलकीच्या अभावाने एकटेपणा आला.

‘ऑक्सीटोसिन स्त्रवते’

क्रिस्टीना म्हणते, की मिठी मारल्याने प्रेम हार्मोन ऑक्सीटोसिन निघतो, जो एकाकीपणा आणि तणाव दूर करण्यासाठी काम करतो. अशा परिस्थितीत त्यांचा हा व्यवसाय लोकांना दिलासा देण्यास मदत करतो. क्रिस्टीनाच्या म्हणण्यानुसार, “अभ्यास दाखवतात की तुम्हाला किमान 20 सेकंद मिठी मारणे आवश्यक आहे, परंतु लोक सहसा फक्त काही सेकंदांसाठी मिठी मारतात, त्यामुळे त्यांना पूर्ण परिणाम जाणवत नाही.”

View this post on Instagram

A post shared by Kristiina (@kristiinalink)

कोरोनात तर अधिक फायद्याची

क्रिस्टीना पुढे म्हणते “कामादरम्यान, मी अनेक लोकांना पाहिले आहे, जे कोरोना महामारीमुळे एकटेपणाची भावना अनुभवत आहेत. लोक दुःखी आहेत आणि त्यांना शारीरिक विश्रांतीची गरज आहे.” अशा लोकांना ती तिची थेरपी देते.

Accident Video Viral : अपघाताचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हालाही कळणार नाही की चूक कोणाची?

Viral Video : महिला रिपोर्टर रिपोर्टिंग करत असते; अचानक म्हातारी व्यक्ती समोर येते, अन्…

मुंबईतली एक झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्टच्या प्रॉडक्ट डिझाइन मॅनेजर! वाचा, महिलेचा थक्क करणारा असा प्रेरणादायी प्रवास

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.