सरप्राईज देणं महागात पडलं…! बॉयफ्रेंडच्या ‘त्या’ कृत्यानंतर तिने सरळ ब्रेकअपच केलं, पण का ?

एका महिलेला तिच्या बॉयफ्रेंडने एक मस्त सरप्राईज दिले. पण ते मिळाल्यावर खुश होण्याऐवजी एवढी भडकली की तिने सरळ ब्रेकअपच केलं. तिच्या बॉयफ्रेंडने नेमकं असं काय केलं ? ती तिथून का निघून गेली ?

सरप्राईज देणं महागात पडलं...! बॉयफ्रेंडच्या  'त्या' कृत्यानंतर तिने सरळ ब्रेकअपच केलं, पण का ?
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 11:53 AM

Ajab Gajab News : सरप्राइज (surprize) मिळणं कोणाला आवडतं नाही, सरप्राईजेस सर्वांनाच आवडतात. मग ते कुटुंबियांकडून मिळालेलं असो, मित्रांकडून किंवा गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंडकडून मिळो ! पण एका महिलेने नुकतंच तिच्या बॉयफ्रेंडने दिलेल्या सरप्राईजबद्दल सांगितलं, मात्र ते पाहिल्यावर आनंद होण्याऐवजी ती रागाने लालेलाल झाली होती.

एवढंच नव्हे तर बॉयफ्रेंडने दिलेलं उत्तर ऐकून ती इतकी रागावली की तिथून सरळ निघूनच गेली. रेडिटवर त्या महिलेने या संपूर्ण प्रकरणाबद्दल लिहीले आहे. ते वाचून काहींनी तिला सपोर्ट केलं तर काहींनी तिची मजाही केली.

बॉयफ्रेंडने केली खास तयारी

महिलेच्या त्या पोस्टनुसार, तिचा बॉयफ्रेंडन मार्कने तिला एका आलिशान जागी येण्याचे निमंत्रण दिले होते. तिथे येण्यापूर्वी तिला वाटले की मार्कने तिला एका खास पार्टीसाठी बोलावलंय, म्हणून ती खास तयारी करून, उत्तम ड्रेस परिधान करून गेली होती. मात्र तिथे गेल्यावर जे दृष्य दिसलं ते पाहून ती अवाक् झाली. तिथे तिचे कुटुंबीय आणि मित्रांसह शेकडो ओळखीचे लोक आले होते. ते तिचीच वाट बघत होते अन् तिची एंट्री होताच सर्वांनी टाळ्या वाजवण्यास सुरूवात केली.

हे सगळं काय आहे असं मार्कला विचारल्यावर मार्कने तिला सांगितलं की ही सगळी खास तयारी त्याने त्या दोघांच्या लग्नासाठी केली होती. मात्र जिचं लग्न होणार होतं, तिला याबद्दल जराही कल्पना नव्हती.

काही मिनिटांतच झालं ब्रेकअप

तिचा बॉयफ्रेंड लग्नाची स्वप्न रंगवत असतानाच त्या आलिशा पार्टीत त्याचे ब्रेकअप होऊन हृदयभंगही झाला. खरंतर त्या महिलेने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहीले की, माझे माझ्या बॉयफ्रेंडवर खूप प्रेम होतं, मी त्याच्यासोबत लग्नाची स्वप्नही रंगवली. पण त्याने मला न सांगताच, जराही कल्पना न देताच ही सगळी तयारी, प्लानिंग केलं आणि (सर्वांना) पार्टीत बोलावलं. यामुळे तिचा विश्वासच तुटला.

हे सगळं काय आहे ? आपण एकत्र लग्नाचा निर्णय घेणार होतो ना ! तू हे फाल्तू सरप्राईज दिलंस आणि सगळा मूडच खराब केलास अस सांगत ती त्याच्यावर भडकली. मार्कने तिला सांगितलं की तुला खुश करण्यासाठी मी हे प्लानिंग केलं. पण हे ऐकून तिला जास्तच राग आला अन् ती तडक निघून गेली.

हे वाचून अनेक युजर्सनी तिला पाठिंबा दिला. लग्न ही एक पार्टनरशिप असते, ते एकमेकांवर असं लादता येत नाही, असं मत एकाने व्यक्त केलं. तर मार्कने तिला न विचारताच असा निर्णय घेतला असेल, तर भविष्यातही तो असं वागू शकतो, अशी शक्यताही एका युजरने वर्तवली. अनेकांनी तिचा (ब्रेकअपचा) निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.