Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | महागडी दारु, खमंग चकणा, महिलांच्या ‘ओल्या पार्टीची’ थेट आयपीएस अधिकाऱ्याकडून दखल, व्हिडीओ व्हायरल

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला मोठ्या थाटामाटात पार्टी करत आहेत. (womens drink party video)

Video | महागडी दारु, खमंग चकणा, महिलांच्या 'ओल्या पार्टीची' थेट आयपीएस अधिकाऱ्याकडून दखल, व्हिडीओ व्हायरल
women drinking liquor
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 4:01 PM

मुंबई : दारुचं व्यसन हे अत्यंत वाईट आहे, असं सगळेच म्हणतात. दारुमुळेच अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झालेली आपण पाहत आलो आहेत. मात्र, सध्या दारु पिणे हे व्यसन न राहता एक ट्रेंड होत चालला आहे. लोकांना दारू पिणं म्हणजे प्रतिष्ठेचं असल्यासारखं वाटतंय. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला मोठ्या थाटामाटात दारुसदृश पेय पिताना दिसत आहे.  महिलांची ही पार्टी चांगलीच रंगात आलेली दिसत आहे. या व्हिडीओची दखल थेट एका आयपीएस अधिकाऱ्याने घेतली आहे. आयपीएस रुपीन शर्मा यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत, मजेदार कॅप्शन दिलं आहे. (womens drink party video goes viral on social media shared by IPS officer)

पार्टीमध्ये महागडे पेय, खमंग पदार्थ 

या व्हिडीओमध्ये महिला शांतपणे बसल्या आहेत.  जवळपास सात ते आठ महिला या गोलाकार वर्तुळ करुन बसल्या असून त्यांच्या समोर एक टेबल आहे. या टेबलवर दारुसारखे दिसणार पेय, त्या पेयाने भरलेला ग्लास ठेवलेला दिसतोय. तसेच या टेबलवर वेगवेगळे खमंग पदार्थ ठेवलेले दिसतायत. व्हिडीओमध्ये काही महिला हे पदार्थ खाताना दिसतायत. तर काही महिला ग्सामधील पेय पितायत. अगदी निवांतपणे गप्पा मारत मारत या महिला पार्टी करत असल्याचं दिसतंय. या महिला दारु पीत असाव्यात असा आंदाज अनेकांकडून बांधण्यात येतोय.

पाहा व्हिडीओ :

लॉकडाऊनमध्ये बाहेर पडण्यापेक्षा हे कधीही चांगलं- आयपीएस रुपीन शर्मा

हा व्हिडीओ आयपीएस अधिकीर रुपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओसोबत एक मजेदार कॅप्शन लिहलं आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अनेक राज्यात विनाकारण घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेर पडून कोरोनाची शिकार होण्यापेक्षा घरात बसून अशा प्रकारे वेळ घालवला तर काय वाईट, असं मिश्किल भाष्य शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये केलं आहे. “काय घेऊन आलो आहोत, काय घेऊन जाणार ?, बाहेर पडण्यापेक्षा हे करणं कधीही चांगलं,” असं त्यांनी म्हटलंय. तसेच, शेवटी हॅश टॅगमध्ये #MaskUpIndia हेसुद्धा त्यांनी आवर्जून लिहलं आहे.

दरम्यान, शर्मा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चचा विषय ठरतोय. या व्हिडीओला कित्येक लोकांनी आपल्या अकाऊंटवर शेअर केले आहे.

इतर बातम्या :

VIDEO | सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… डोक्यावर पदर सावरत गाणाऱ्या आजींचा गोड व्हिडीओ पाहिलात?

VIDEO | सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… डोक्यावर पदर सावरत गाणाऱ्या आजींचा गोड व्हिडीओ पाहिलात?

Video | इंजेक्शनची सुई पाहून तरुणीला फुटला घाम, नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !

(womens drink party video goes viral on social media shared by IPS officer)

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.