Video : जगातला सर्वात महागडा उंट, किंमत माहीत आहे का? सौदी अरेबियात नुकताच झालाय लिलाव; वाचा सविस्तर
Expensive Camel video : इस्लामचा पवित्र महिना रमजान (Ramzan) सुरू होणार आहे. याआधीही सौदी अरेबियात (Saudi arebia) महागड्या किंमतीत एक उंट (Camel) विकला गेला आहे. या उंटासाठी 7 मिलियन सौदी रियाल म्हणजेच सुमारे 14 कोटी 23 लाख रुपयांची बोली लागली आहे.
Expensive Camel video : इस्लामचा पवित्र महिना रमजान (Ramzan) सुरू होणार आहे. याआधीही सौदी अरेबियात (Saudi arebia) महागड्या किंमतीत एक उंट (Camel) विकला गेला आहे, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या उंटाची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. हा जगातील सर्वात महागडा उंट असल्याचे बोलले जात आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की या उंटासाठी 7 मिलियन सौदी रियाल म्हणजेच सुमारे 14 कोटी 23 लाख रुपयांची बोली लागली आहे. ‘गल्फ न्यूज’च्या वृत्तानुसार, सौदी अरेबियामध्ये या उंटाचा सार्वजनिक लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. यामध्ये पारंपरिक वेशभूषा केलेला एक व्यक्ती मायक्रोफोनद्वारे लिलावात बोली लावताना दिसत आहे.
सुरुवातीची बोली 5 मिलियन सौदी रियाल
उंटाची सुरुवातीची बोली 5 मिलियन सौदी रियाल म्हणजेच सुमारे 10 कोटी 16 लाख रुपये ठेवण्यात आली होती. यानंतर त्याची बोली 7 दशलक्ष सौदी रियालच्या बोलीवर अंतिम करण्यात आली. मात्र, एवढी जास्त बोली लावून उंट कोणी विकत घेतला, याचा खुलासा झालेला नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की उंट मध्यभागी दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला हे बोली लावणारे पारंपरिक कपडे परिधान केलेले लोक लिलावात सहभागी होताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहा…
— مقاطع فيديو (@Yoyahegazy1) March 25, 2022
उंटाची खासियत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
सौदी अरेबियात एवढ्या महागड्या किंमतीत लिलाव झालेला हा उंट जगातील दुर्मीळ उंटांपैकी एक मानला जातो. हा उंट त्याच्या खास सौंदर्य आणि वेगळेपणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. जगात या प्रजातीचे उंट फार कमी आहेत. सौदी अरेबियाच्या लोकांच्या जीवनात उंटांचा समावेश आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. सौदी अरेबियामध्ये ईदच्या दिवशी उंटांची कुर्बानी दिली जाते. जगातील सर्वात मोठा उंट मेळा सौदी अरेबियातही भरतो.