AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात छोटी सोन्याची हॅंडबॅग बनविली, साखरेच्या दाण्यापेक्षा सुक्ष्म, उदयपूरच्या कारागिराची कमाल

सक्का यांनी सुक्ष्म हॅंडबॅगला तिरंगा नाव दिले आहे. त्याला तिरंगी रंगही दिला आहे. या बॅगेचा लिलाव करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहीले आहे.

जगातील सर्वात छोटी सोन्याची हॅंडबॅग बनविली, साखरेच्या दाण्यापेक्षा सुक्ष्म, उदयपूरच्या कारागिराची कमाल
Iqbal sakka Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 04, 2023 | 9:50 PM
Share

नवी दिल्ली | 3 ऑगस्ट 2023 : ते अत्यंत कलाकुसरीने काम करीत असतात. त्यांना एका डोळ्याने दिसत नव्हते तरी त्यांनी तीन दिवस मेहनत करीत जगातील सर्वात लहान 24 कॅरेट सोन्याची बॅग तयार केली आहे. यापूर्वी जगातीस सर्वात सुक्ष्म बॅग तयार करण्याचा रेकॉर्ड अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या नावावर होता. आता उदयपूरच्या डॉ. इकबाल सक्का या कारागिराने ही 0.02 इंच लांबीची बॅग तयार केली आहे. या साखरेच्या दाण्याहून कमी आकाराच्या या बॅगेचे नाव तिरंगा बॅग ठेवण्यात आले आहे.

डोळ्यांची दृष्टी गेली तरी काम थांबवले नाही

डॉ. इकबाल सक्का यांनी म्हटले की या हॅंडबॅगला 24 कॅरेट सोन्यापासून बनविली आहे. या सोन्याच्या बॅगला तीन दिवसात बनविण्यात आली आहे. या कामादरम्यान त्याने एका डोळ्याने दिसायला बंद झाले. तरीही त्यांनी एका डोळ्याने काम पूर्ण केले. ऑपरेशननंतर त्यांना त्या डोळ्याने दिसू लागले आहे. एकाच जागी टक लावून पाहील्याने त्यांच्या डोळ्याला त्रास झाला असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

उदयपूरचे नाव जगभर गाजवले

सक्का यांनी सुक्ष्म हॅंडबॅगला तिरंगा नाव दिले आहे. त्याला तिरंगी रंगही दिला आहे. या बॅगेचा लिलाव करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहीले आहे. या सुक्ष्म हॅंडबॅगला सोन्याच्या वजन काट्यावर ठेवले तर त्याचे कोणतेही वजन दाखविले गेले नाही. यापूर्वी सक्का यांना अशा अजबगजब वस्तू तयार करण्यासाठी अनेक पूरस्कार मिळणार आहेत. उदयपूरचे नाव त्यांनी अजरामर केले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.