Ambani House : अवघ्या दोन रुपयांत पाहा अंबानी यांचा आलिशान महल
Ambani House : अंबानी कुटुंबियांचे आलिशान घर तुम्हाला आतून पण पाहता येईल. त्यासाठी अवघे 2 रुपायंचे शुल्क आकारण्यात येत आहे...
नवी दिल्ली : अंबानी हे देशातील नावाजलेले कुटुंब आहे. हे कुटुंब केवळ त्यांच्या व्यावसाय, व्यापारासाठीच नाही तर कौटुंबिक मूल्यांसाठी पण ओळखल्या जाते. हे कुटुंब त्यांच्या महागड्या जीवनशैलीसाठी पण प्रसिद्ध आहे. शानदार घडाळ्यांपासून ते महागड्या कारपर्यंत सर्वच गोष्टींचा कौतुक सोहळा होतो. वाचकांना पण त्यांच्याविषयीच्या घडामोडी जाणून घ्याव्याशा वाटतात. हे कुटुंब नेहमी चर्चेत असते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे मुंबईतील एंटालिया हे घर राजमहलापेक्षा कमी नाही. जगातील सर्वात महागड्या घरापैकी ते एक आहे. हे जगातील दुसरे सर्वात महागडे घर आहे.
ही वास्तू येईल पाहता एंटालिया पाहण्याची सर्वांनाच इच्छा आहे. सर्वसामान्यांना या घराविषयी मोठी उत्सुकता आहे. पण सर्वसामान्यांना या घरात जाणे सोपे काम नाही. पण एंटालिया व्यतिरिक्त अंबानी कुटुंबियांचं एक जुनं घर आहे. घर काय, हा मोठा महलच आहे. हे घर तुम्हाला पाहता येईल. या घराला भेट देण्यासाठी अनेक लोक येतात.
कुठे आहे हा राजवाडा अंबानी कुटुंबिय हे मुळचे गुजरात राज्यातील आहेत. जुनागड जिल्ह्यातील चोरवाड हे त्यांचे मूळ गाव. या गावात त्यांची अनेक वर्षांपासूनचे वडिलोपार्जित घर आहे. 20 व्या शतकात हा भव्यदिव्य वाडा त्यांच्या अगोदरच्या पिढीने भाड्यानं घेतला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजची सुरुवात करणारे धीरुभाई अंबानी यांचा जन्म याच घरात झाला होता. या दोन मजली हवेलीला 2011 मध्ये स्मारक करण्यात आले.
किरायाने घेतले घर 20 व्या शतकाच्या सुरुवातीला मुकेश अंबानी यांच्या पणजोबांनी जमनादास अंबानी यांनी हे घर भाड्याने घेतले होते. हे घर गुजराती शैलीचे उत्तम उदाहरण आहे. या घरासमोर मोठं आंगण आहे. अनेक कमरे आणि मोकळ्या जागा आहेत. हा महल 1.2 एकर जमिनीवर पसरलेला आहे. या घराच्या चारही बाजूंनी हिरवळ आहे. हे घर तीन भागात विभागल्या गेले आहे. त्यातील काही भाग अंबानी कुटुंबियांसाठी राखीव तर दुसरा भाग सर्वसामान्य जनतेसाठी आहे.
अनेक आठवणी गाठिशी मुकेश अंबानी यांच्यासाठी हे घर अत्यंत महत्वाचे आहे. त्यांचे या घराशी ऋणानुबंध जोडल्या गेले आहेत. या घराशी संबंधित अनेक आठवणी त्यांच्या गाठीशी आहेत. त्यांनी अनेक महिने या घरात आजी-आजोबांसोबत घालविले आहेत. हे घर तुम्हाला पाहता येईल. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे घर पाहता येते. त्यासाठी नाममात्र दोन रुपये शुल्क द्यावे लागेल.