चिमुरडीचं आईवरचं प्रेम पाहून तुम्हीही भावुक व्हाल, Viral emotional videoमधले बोबडे बोल पुन्हा पुन्हा ऐकाल

Kid cute video : सोशल मीडिया(Social media)वर लहान मुलां(Kid)चे व्हिडिओ व्हायरल होत असतात. एका चिमुरडीचा छोटासा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यात ती आपल्या आई(Mother)विषयी विचार करताना दिसते. तिचे बोबडे बोल आपल्याला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला भाग पाडतात.

चिमुरडीचं आईवरचं प्रेम पाहून तुम्हीही भावुक व्हाल, Viral emotional videoमधले बोबडे बोल पुन्हा पुन्हा ऐकाल
मॉलमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आलेले बाप-लेक
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 7:30 AM

Kid cute video : सोशल मीडिया(Social media)वर लहान मुलां(Kid)चे व्हिडिओ लवकर व्हायरल होत असतात. लहान मुले निष्पाप असतात. त्यांच्यातला गोंडसपणा सर्वांनाच भावतो. लहान मुलांचे मजेशीर व्हिडिओ तर तुम्ही पाहिले असतीलच. पण भावुक असे व्हिडिओही सोशल मीडियावर अपलोड केले जातात. लहान मुलांमधला विचारी भाव मोठ्यांसारखे मोठे विचार असे व्हिडिओ लोक जास्त आवडीने पाहतात. त्याचं कौतुकही करायला मग मागेपुढे पाहत नाहीत. एका चिमुरडीचा छोटासा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यात ती आपल्या आई(Mother)विषयी मोठा विचार करताना दिसते. तिचे बोबडे बोल आपल्याला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला भाग पाडतात. एका मॉलमधला हा व्हिडिओ आहे. ते एका मॉलमध्ये कपडे खरेदी करत असतात. त्यातले काही त्यांना आवडतात. त्यावेळी बाप-लेकीतला संवाद यात दाखवलाय.

कपडे खरेदीसाठी मॉलमध्ये

व्हिडिओमध्ये एक चिमुरडी दिसतेय. मॉलमध्ये ती आपल्या वडिलांसोबत आलीय. ते कपडे खरेदी करण्यासाठी आलेले असतात. पहिल्यांदा वडिल म्हणतात, हा एक ड्रेस तुझ्या मावशीसाठी आपण घेतोयत. मग ते पुढे जातात. त्यांना एक छानसा लाल ड्रेस दिसतो. वडिल म्हणतात, हा कसा आहे? मुलगी म्हणते छान आहे, पण हा आईसाठी घेऊ. वडिल म्हणतात, आई तर आपल्यात नाही. त्यानंतर मुलगी जे काही म्हणते, ते काळजाला भिडतं.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर अझान फाइव्ह स्टार (Azhan5star) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 6 फेब्रुवारीला अपलोड या व्हिडिओला यूझर्सनी चांगलीच पसंती दिलीय. एकाच दिवसात 3 मिलियनहून अधिकचा टप्पा या व्हिडिओनं ओलांडलाय. त्यात आणखी वाढ होतेय. ‘Maa k liye ek comment to Banta hai’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. यूझर्स हा व्हिडिओ लाइक करत असून त्यावर कमेंट्सही करत आहेत. (Video Courtesy – Azhan5star)

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची छोटी मुलं चालवतायत रेस्टॉरंट; Video पाहून Anand Mahindraही भावुक, म्हणाले…

Kacha Badam : बंगालीनंतर आता हरयाणवी वर्जननं घातलाय धुमाकूळ, 32 लाखांहून जास्तवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Video

वर म्हणतो, ‘मैं झुकेगा नहीं; यूझर्स म्हणतायत, आता नाही पण भांडी घासताना मात्र झुकावच लागेल! Video viral

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.