Video : हाय हिल्स घालून तरूणीचा ‘फुटबॉल डान्स’, व्हीडिओ पाहून चक्रावून जाल…
या मुलीने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. यासोबतच तिने पायात हाय हिल्स घालून डान्स करताना दिसत आहे. सुरुवातीला ती पायांनी फुटबॉल खेळताना दिसत आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल (viral video) होत असतात. आताही असाच एक हटके व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरूणी हाय हिल्स घालून फुटबॉल खेळताना पाहायला मिळत आहे. परदेशात सर्वाधिक फुटबॉल पाहिला आणि खेळला जातो. सोशल मीडियावर लोक फुटबॉल आणि संबंधित व्हीडिओंनाही खूप प्रेम देतात.या मुलीने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. यासोबतच तिने पायात हाय हिल्स घालून डान्स करताना दिसत आहे. सुरुवातीला ती पायांनी फुटबॉल खेळताना दिसत आहे. व्हीडिओमध्ये मुलगी ज्या पद्धतीने फुटबॉल ट्रिक्स करत आहे, त्यावरून ती मुलगी प्रोफेशनल फुटबॉलपटू असल्याचं दिसतंय. पुढे व्हिडिओमध्ये, मुलगी तिच्या खांद्यावरून फुटबॉल (Football dance) खेळवताना दिसतेय.
View this post on Instagram
या व्हीडिओमध्ये दिसणार्या मुलीचं नाव अगुस्का मिनिच आहे. जी फ्रीस्टाइल फुटबॉल चॅम्पियन आहे. या व्हीडिओमध्ये हाय हिल्समध्ये ती फुटबॉल खेळताना दिसत आहे. आतापर्यंत हा व्हीडिओ 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हीडिओला तर दहा हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तिच्या या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट करून व्हीडिओ आवडल्याचं म्हटलंय.
‘जरा हटके’ व्हायरल
आज आम्ही तुम्हाला आलियाच्या डुप्लिकेट कॉपीबद्दल सांगणार आहोत. या मुलीच्या व्हीडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या मुलीचा लूक सेम टू सेम आलिया भट्टसारखा वाटतोय. तिची स्टाईल पाहून लोक तिच्या अदांवर फिदा झालेत. तिला पाहिलं की आपण आलियालाच पाहत आहोत असा फिल येतो. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हीडिओने एकच खळबळ उडवून दिली आहे. या मुलीने ‘गंगूबाई काठियावाडी’मधल्या आलिया भट्टच्या लूकसारखा लूक केलाय. त्यामुळे तिची जोरदार चर्चा आहे.
View this post on Instagram