Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | हवेत उडी घेणाऱ्या तरुणाचा खतरनाक स्टंट; IPS अधिकारी म्हणातो सुरुवातीला अशक्य वाटतं पण नंतर…

सर्वांना आश्चर्यचकित करणारा एक स्टंट व्हायरल होत आहे. सोशल मीडियामध्ये या स्टंटने धुमाकूळ घातला आहे. (young man dangerous stunt video)

Video | हवेत उडी घेणाऱ्या तरुणाचा खतरनाक स्टंट; IPS अधिकारी म्हणातो सुरुवातीला अशक्य वाटतं पण नंतर...
तरुणाने अशा प्रकारे थरारक स्टंट केला.
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 11:58 AM

मुंबई : असं म्हणतात की या जगात टॅलेंटची कमी नाही. कधी एखादी व्यक्ती काय करेल याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या स्टंटचे हजारो व्हिडीओ अपलोड होतात. हे स्टंट पाहून अनकेजण अचंबित होतात. सध्या असाच सर्वांना आश्चर्यचकित करणारा एक स्टंट व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या स्टंटने धुमाकूळ घातला आहे. या स्टंटचा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा (Dipanshu Kabra) यांनी पोस्ट केला आहे. (young man doing dangerous stunt IPS officer Dipanshu Kabra posted it on social media video goes viral)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना एक समर्पक कॅप्शनसुद्धा लिहलं आहे. “जोपर्यंत आपण एखाद्या कामाला पूर्ण करत नाही, तोपर्यंत ते काम अशक्यच वाटते,” असे त्यांनी लिहलं आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही. मात्र, या व्हिडीओला लोकांची चांगलीच पसंदी मिळत आहे. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका तरुणाने दोन लोखंडी खुर्च्यांच्या सहाय्याने एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये पाणी ठावले आहे. लांबून पळत येत हा तरुण उलटी उडी मारून हवेत आपलं डोकं पाण्यामध्ये घालतोय. लगेच हवेतच आपलं डोकं वर काढत पुन्हा य़शस्वीरित्या उडी मारून परत जमिनीवर येतोय.

या व्हिडीओतील तरुणाची करामत पाहून सर्वच नेटकरी अचंबित झाले आहेत. या तरुणाची शरीराच्या हालचालीवर असलेली पकड आणि स्टंटसाठी त्यांने केलेल्या प्रयत्नांची सर्वांकडून वाहवा होत आहे.

दरम्यान, हा स्टंट दिसायला जरी एवढा सोपा वाटत असला तरी, यामध्ये शरीराला इजा होण्याची शक्यता आहे. स्टंट करताना थोडीजरी चूक झाली तर मानेला किंवा शरीराच्या इतर भागाला जबर मार लागू शकतो. त्यामुळे हा स्टंट सोशल मीडियावर अपलोड करण्यापूर्वी आयपीएस ऑफिसरने एक वॉर्निंग दिली आहे. लोकांनी हा स्टंट करण्याचा प्रयत्न करु नये, अस त्यांनी म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

VIDEO: जम्मू काश्मीरमध्ये सर्वांसमोर बिबट्याचा एकावर हल्ला, कुणाचीही हिंमत झाली नाही, अखेर एकाच्या हिमतीने जीव वाचला

Video | इंजिनिअरिंग म्हणजे काय रे भाऊ?, कॉपी करुन पास होणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहाच

VIDEO: ‘कोरोना लसीचा पावर, थेट धावत्या रेल्वेला लाथ मारली’, तुम्ही व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिलाय?

(young man doing dangerous stunt IPS officer Dipanshu Kabra posted it on social media video goes viral)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.