Video: जीव देण्यासाठी ती पटरीवर झोपली, पण तिला वाचवण्यासाठी महबूब सरसावला आणि रेल्वे आली, पुढं जे झालं ते नक्की बघा.
भोपाळमधून (Bhopal) एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीने आत्महत्येच्या (Suicide) उद्देशाने वेगाने येत असलेल्या मालगाडीच्या समोर उडी मारली. या तरुणीने जेव्हा मालगाडीसमोर उडी मारली त्यावेळी तिथे एक तरुण देखील हजर होता. या तरुणाने आपल्या जीवाची परवा न करता तरुणीचे प्राण वाचवले.
भोपाळ : भोपाळमधून (Bhopal) एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीने आत्महत्येच्या (Suicide) उद्देशाने वेगाने येत असलेल्या मालगाडीच्या समोर उडी मारली. या तरुणीने जेव्हा मालगाडीसमोर उडी मारली त्यावेळी तिथे एक तरुण देखील हजर होता. या तरुणाने आपल्या जीवाची परवा न करता, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता या तरुणीचा जीव वाचवण्यासाठी तो तरुणीकडे झेपावला. समोर अतिशय वेगाने मालगाडी येत होती. मात्र या तरुणाने प्रसंगावधान दाखवत या तरुणीला मागे ओढले. तरुणाने तिला मागे ओढल्यामुळे ते दोघेही रेल्वे रूळामध्ये ( railway tracks) अडकले आणि ही मालगाडी त्यांच्यावरून गेली. या घटनेमध्ये दोघांचे देखील प्राण वाचले आहे. भोपाळच्या बरखेडी रेल्वे फाटकासमोर हा प्रकार घडला आहे. मेहबूब असे या आत्महत्या करण्यासाठी उडी मारणाऱ्या तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
अन् तरुणामुळे वाचले प्राण
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भोपाळमधील बरखेडी परिसरातील रेल्वे फाटका जवळ एक तरुणी उभी होती. याचदरम्यान एक मालगाडी अतिशय वेगाने समोर येत होती. आत्महत्येच्या उद्देशाने या तरुणीने या मालगाडीसमोर उडी मारली. मात्र ही घटना तेथे उभा असलेल्या तरुणाच्या लक्षात आली. त्याने स्व:ताच्या जीवाची परवा न करता तो या तरुणीकडे झेपावला दोघेही रेल्वे रुळाच्यामध्ये अडकले. त्यांच्यावरून रेल्वे गेली या घटनेत हे दोघेही थोडक्यात बचावली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
दरम्यान मेहबूब असे या धाडसी तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर तरुणाच्या धाडसीपणाचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे. त्याने आपली जीव धोक्यात घालून तरुणीचा जीव वाचवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हा घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, काश/if Kakvi या ट्विरर हॅंडलवरू हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नेटकरी देखील या तरुणाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
एक युवती ने आत्महत्या के नज़रिए से चलती मालगाड़ी के आगे छलांग लगा दिया।
वहा पर मौजूद युवक महबूब ने किशोरी को बचाने के लिए ट्रेन के समाने छलांग लगा दी, लड़की को पटरी के बीच पकड़े रहा जब तक ट्रैन ऊपर से नहीं निकल गई, दोनों सुरक्षित।
वीडियो #Bhopal के बरखेड़ी फाटक का।@anilscribe pic.twitter.com/HxExQ0OPtK
— काश/if Kakvi (@KashifKakvi) February 11, 2022
संबंधित बातम्या
#AirtelDown : ‘नेटवर्क ठप्प’वर Airtelचं स्पष्टीकरण नाही, ग्राहकांना मनस्ताप; Share केले Memes
Viral Video : कधीच सोडणार नाही तुझा हात..! जोडप्याचं प्रेम पाहून तुम्हीही गहिवरून जाल