महिलेनं असा काही धडा दिला, तरूण म्हणतो बिझनेसपेक्षा जॉबच बराच; Video Viral

एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय. जॉब (Job) की बिझनेस (Business) असा हा विषय आहे. अनेकांना जॉब करायला आवडतं. तर अनेकजण व्यवसायास पसंती देतात. पण व्यवसाय करणं खरंच सोपं असतं का? पैसा (Money) मिळत असला तरी सातत्य आणि मेहनत ही खूप जास्त करावी लागते तर कुठे यश मिळतं. आता या व्हिडिओमधला व्यक्तीही संभ्रमात पडलाय, की मी बिझनेस करू की जॉब?

महिलेनं असा काही धडा दिला, तरूण म्हणतो बिझनेसपेक्षा जॉबच बराच; Video Viral
व्यवसाय सुरू करणारा तरूण आणि महिला
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 10:36 AM

Job Vs Business : सध्या सोशल मीडियाचं जग आहे. आपल्याला व्यक्त होण्यासाठीचं महत्त्वाचं माध्यम. सोशल मीडियावर विविध विषयांवरचे व्हिडिओ आपण पाहत असतो. ते आपलं मनोरंजन करत असतात. माहितीपर व्हिडिओ तर असतातच. पण यूझर्सचा भर मनोरंजनात्मक, विनोदी व्हिडिओंवर असतो. आपल्या व्यस्त जीवनशैलीत हलकेफुलके क्षण अनुभवण्यासाठी मग असे व्हिडिओ पाहिले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय. जॉब (Job) की बिझनेस (Business) असा हा विषय आहे. अनेकांना जॉब करायला आवडतं. तर अनेकजण व्यवसायास पसंती देतात. पण व्यवसाय करणं खरंच सोपं असतं का? पैसा (Money) मिळत असला तरी सातत्य आणि मेहनत ही खूप जास्त करावी लागते तर कुठे यश मिळतं. आता या व्हिडिओमधला व्यक्तीही संभ्रमात पडलाय, की मी बिझनेस करू की जॉब?

तरुणाला वाटतं चांगला सुरू आहे व्यवसाय

एका तरुणाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. ही व्यक्ती बँकेत नोकरीला असते. पण त्याला बिझनेस करायची हुक्की येते. तो ऑप्टिकल स्टोअर सुरू करतो. सुरुवातीला पैसा यायला लागतो. त्याला वाटतं की बिझनेस खूप चांगला सुरू आहे. कारण ग्राहकही येत होते तसा पैसाही यायला लागला. त्याला असं वाटायला लागलं की जॉबपेक्षा बिझनेस किती चांगला आहे. मिळकत चांगली होतेय.

महिला चांगलीच धडा देते

एक दिवस त्याच्या स्टोअरमध्ये एक म्हातारी महिला येते. ती डोळे तपासते. कारण तिला दिसत नसतं. तो तिला वाचायला सांगतो, पण तिला काही दिसत नसतं. मग तो तिला दुसऱ्या दिवशी यायला सांगतो. नवीन लेन्सही आणतो. पण त्या महिलेला काही दिसत नाही. शेवटी त्या महिलेसमोर हात जोडून मी तुमच्यावर उपचार करू शकत नाही, असं म्हणतो. त्यावर ती महिला काय म्हणते, त्यासाठी व्हिडिओ तर पाहायलाच हवा.

यूझर्सच्या कमेंट्स आणि लाइक्स

प्रियल कुकरेजा (Priyal Kukreja) या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 28 जानेवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 7,250,169+ व्ह्यूज मिळाले आहेत. यूझर्सकडून लाइक आणि कमेंट्स यावर पडताहेत. तुम्हीही हा व्हिडिओ पाहा आणि कमेंट्स वाचा. (Video Courtesy – Priyal Kukreja)

Chimpanzee : धावत जाऊन चिंपांझीनं महिलेला मिठी मारली, Viral Video पाहून यूझर्स भावुक

Chicken Burgerचा हा Video पाहून यूझर्स म्हणतायत, ओ मेरे बर्गर जो तुम खाओगे, बड़ा पछताओगे!

Viral : दोन इमारतींवरून कशी मारली उडी? Videoमध्ये पाहा excellent Jump

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.