Viral : कोट्यवधी रुपयांच्या बुगाडीवर अब्जावधीची सर्जनशीलता भारी! अफलातून Creativityचा ‘हा’ Video पाहाच
Bugatti creative video : एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये काही तरूण आपल्या सर्जनशीलते(Creativity)चे उत्तम उदाहरण सादर करत आहेत. तरुणांनी माती, प्लास्टिक आणि टिनचा वापर करून कार बनवली.
Bugatti creative video : आजच्या काळात काहीतरी वेगळे, काहीतरी नवीन करण्याची इच्छा माणसाला आयुष्यात पुढे घेऊन जाते. आजचे जग सर्जनशील झाले आहे ही जीवनात उत्साह टिकवून ठेवते. तुम्ही अशा अनेक लोकांबद्दल ऐकले असेल, जे त्यांच्या सर्जनशीलतेने जगभरातील लोकांना त्यांच्याकडे आक आणि सर्जनशीलतार्षित करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये काही तरूण आपल्या सर्जनशीलते(Creativity)चे उत्तम उदाहरण सादर करत आहेत. त्याची सृजनशीलता पाहून बड्या कलाकारांनाही आश्चर्य वाटेल. अनेकांना महागड्या गाड्यांचे आकर्षण असते. मात्र ते खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने केवळ पाहण्यातच अनेकजण धन्यता मानतात. त्यांच्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे. सोशल मीडियावर अनेकदा अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यापैकी काही तुम्हाला हसवतात आणि काही भावुक करतात तर काही खूप आश्चर्यचकित करतात. हा व्हिडिओ देखील असाच काहीसा आहे, जो पाहून तुम्हीही हैराण झाल्याशिवाय राहणार नाही.
माती, प्लास्टिक आणि टिनचा वापर
या व्हिडिओमध्ये काही तरुणांनी माती, प्लास्टिक आणि टिनचा वापर करून आणि आपल्या क्रिएटिव्हिटीचा वापर करून एक उत्तम कार बनवली आहे, जी बुगाटी कारसारखी दिसते. ही कार पाहिल्यानंतर असली आणि नकली यात फरक करणेही अवघड आहे. युवक एका ठिकाणाहून माती कशी आणतात आणि त्याचा वापर कार बनवण्यासाठी करतात, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. याशिवाय त्यांनी प्लास्टिक आणि टिनचाही वापर केला आहे. तरुणांनी गाडीचे इंजिन लावले आणि मग सर्जनशीलतेचा असा काही नमुना दाखवला, की जग बघतच राहील. गाडी रस्त्यावर आल्यावर बघणारेही आश्चर्यचकित झालेत.
ट्विटर हँडलवर शेअर
हा जबरदस्त व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की कोटी रुपयांची बुगाटी खरेदी करण्याची काय गरज आहे, जेव्हा तुमच्याकडे अब्जावधींची सर्जनशीलता आणि कौशल्ये आहेत!’. हे अगदी बरोबर आहे. जर एखादी व्यक्ती सर्जनशील असेल तर त्याच्यासाठी कार काय आहे, तो एक हेलिकॉप्टरदेखील बनवू शकतो आणि लोकांनी ते बनवले आहे. 2 मिनिटे 19 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 8 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर उत्तम कमेंट्सही केल्या आहेत.
करोड़ों रु की #Bugatti खरीदने की क्या ज़रुरत है, जब आपमें अरबों की क्रियेटिविटी और स्किल्स हों!#SkillWins pic.twitter.com/WtCmb78lAN
— Dipanshu Kabra (@ipskabra) February 9, 2022
आणखी बातम्या :