Viral Memes | नाकातून रक्त काढून दाखवा, स्वप्नील जोशी ते अण्णा नाईक, सेलिब्रिटींकडून ऐका त्यांचे आवडते मीम्स

'झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2020-21' च्या निमित्ताने कलाकारांना त्यांचे व्हायरल झालेले आवडते मीम्स विचारण्यात आले. (Zee Marathi Awards Viral memes )

Viral Memes | नाकातून रक्त काढून दाखवा, स्वप्नील जोशी ते अण्णा नाईक, सेलिब्रिटींकडून ऐका त्यांचे आवडते मीम्स
झी मराठीच्या मालिकांचे मीम्स
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 3:44 PM

मुंबई : राजकारण, चित्रपट किंवा समाजकारण… कुठल्याही क्षेत्रात एखादी घडामोड घडली, की त्यावर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होऊ लागतात. एखाद्या मालिकेत कुठला हटके ट्रॅक आला, की त्यावरही सोशल मीडियातून भन्नाट शेरेबाजी होते. झी मराठी वाहिनीवरील कलाकारांचेही असेच काही मीम्स व्हायरल झाले आहेत. (Zee Marathi Awards 2020 Trending Viral memes on Serials Anna Naik Ratris Khel Chale)

स्वप्नील जोशीचा आवडता मीम कोणता?

‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2020-21’ च्या निमित्ताने कलाकारांना त्यांचे व्हायरल झालेले आवडते मीम्स विचारण्यात आले. त्यावेळी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पाहुण्याच्या खुर्चीत बसून सातमजली हास्याने खळखळाट उडवणारा प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यानेही आपले आवडते मीम सांगितले. आपल्या फोटोखाली एका कमेंटमध्ये ‘सर, नाकातून रक्त काढून दाखवा ना’ असं लिहिलं होतं. या कमेंटसह फोटोचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आणि मीम बनले, असे स्वप्नील सांगतो.

अण्णा नाईकांचे फेवरेट मीम

दिग्गज अभिनेते माधव अभ्यंकर ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिसऱ्या पर्वातही अण्णा नाईक यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. खरं तर रात्रीस खेळ चाले आणि अण्णा नाईक, शेवंता, माई, पांडू अशा मालिकेतील सगळ्याच लोकप्रिय व्यक्तिरेखांचे अनेक मीम्स गाजले आहेत. त्यामुळे आवडतं मीम शोधणं हा खरं तर कठीण टास्क आहे.

अण्णा हजारे आणि अण्णा नाईक यांची तुलना करणारं एक मीम व्हायरल झालं होतं. ते आपलं आवडीचं असल्याचं उत्तर अभिनेते माधव अभ्यंकर यांनी दिलं. अर्थात अण्णा हजारे यांचा अवमान करण्याचा कुठलाही हेतू नाही, त्यांचं काम निःसंशयपणे उत्तमच आहे, मात्र विनोदाचा भाग म्हणून पाहिल्यास ‘अण्णा उपाशी आणि अण्णा तुपाशी’ हे मीम आवडल्याचं त्यांनी सांगितलं.

लाडाच्या लेकीचे लाडके मीम कोणते

‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत कस्तुरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिताली मयेकरचं नुकतंच लग्न झालं. लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत ती विवाहबंधनात अडकली. तिच्या लग्नातील एका फोटोचं मीम चाहत्यांनी केलं होतं. तीन खिडक्या असलेल्या वाड्यात मिताली आणि सिद्धार्थ कोपऱ्यात उभे होते, तर मधल्या खिडकीत झपाटलेला सिनेमातील दिलीप प्रभावळकर यांचा फोटो लावून मीम तयार करण्यात आलं आहे. ते आपलं आवडतं मीम असल्याचं मिताली सांगते. (Zee Marathi Awards 2020 Trending Viral memes on Serials Anna Naik Ratris Khel Chale)

पाहा व्हिडीओ 

संबंधित बातम्या :

‘साथ दे तू मला’ फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचा साखरपुडा

(Zee Marathi Awards 2020 Trending Viral memes on Serials Anna Naik Ratris Khel Chale)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.