डिलिव्हरी बॉय एक तास उशिरा आला, त्याला बघताच ग्राहकाने…बघा व्हिडीओ बघा
या व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट्स करत आहेत. व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

झोमॅटो स्विगी याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंटरनेट वर धुमाकूळ घालत असतात. कधी कधी तर लोकांचाही यात सहभाग असतो. एक फूड डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी सुमारे एक तास उशिरा पोहोचला पण ग्राहकाने रागवण्याऐवजी आरतीची थाळी घेऊन त्याचं स्वागत केलं. या व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट्स करत आहेत. व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
हा व्हिडिओ संजीव कुमार नावाच्या युजरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. एका दिवसातच या व्हिडिओला 20 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
या व्हिडिओ क्लिपसोबत संजीव कुमार यांनी लिहिले की, ”दिल्लीची वाहतूक असूनही जेव्हा तुम्हाला तुमची ऑर्डर मिळते. थैंक्स झोमॅटो.”‘
View this post on Instagram
फूड डिलिव्हरी बॉयच्या स्वागतासाठी संजीव कुमार आरतीची थाळी घेऊन उभे आहेत. डिलिव्हरी बॉय त्यांच्या घराच्या दारात पोहोचताच कुमार सानूचं ‘आये आपका इंतजार था’ हे प्रसिद्ध गाणं बॅकग्राऊंडला सुरू होतं.
त्यानंतर संजीव कुमार डिलिव्हरी बॉयच्या कपाळावर तिलक लावतात आणि हसत हसत त्याच्याकडून जेवण घेतात.
संजीव कुमार यांचं डिलिव्हरी बॉयसोबतचं वागणं लोकांच्या मनाला स्पर्शून गेलं. हा व्हिडिओ अतिशय क्यूट आहे, अशा अनेकांनी कमेंट्स केल्या.