मायलेकरांच्या यशाचा डंका; एकाचवेळी एकाच परीक्षेत आई आणि मुलाला मिळाली सरकारी नोकरी
आई आणि मुलाच्या या यशामुळे बिंदू आणि त्यांचा मुलगा विवेक हा केरळमध्ये चर्चेचा विषय झाले आहेत, फक्त ती चर्चाच नाही तर त्यांच्या या यशाचे कौतुकही होत आहे. बिंदू स्वतः सांगतात की, सरकारी नोकरीसाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे.
मुंबईः भारतात असं म्हटलं जातं की, ज्या घरात सरकारी नोकरी (Government Job) करणारी माणसं असतात, त्या घराचा थाट काय वेगळाच असतो. आणि घरातील मुलगा आणि मुलगी (Mother And Son) दोघंही नोकरी असली तर काय मग आई वडिलांची छाती नेहमीच गर्वाने फुलून गेलेली असते, हे असं असलं तरी केरळमधील एक वेगळीच घटना समोर आली आहे, साक्षरतेच्या बाबतीत केरळ राज्य नेहमीच पुढारलेलं राहिलेलं आहे, त्या केरळमध्ये एकाच वेळी एकाच पदावर मायलेकारांना नोकरी मिळाली आहे. केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशनने (PSC) घेतलेल्या कनिष्ठ क्लार्क पदासाठी परीक्षा घेतली होती, त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्या निकालाच्या यादीत मायलेकरांची नाव आली आहेत.
“We went together to coaching classes. My mother brought me to this and my father arranged all facilities for us. We got a lot of motivation from our teachers. We both studied together but never thought that we’ll qualify together. We’re both very happy,” said Vivek, son of Bindu pic.twitter.com/2qu23d0IHX
— ANI (@ANI) August 10, 2022
मुलासाठी म्हणून क्लास लावला
अंगणवाडी सेविका असलेल्या 42 वर्षाच्या बिंदू आणि त्यांचा मुलगा विवेक जो 24 वर्षाचा आहे. या दोघांनीही एकाच वेळी केरळ पीएससीची एलडीसीची परीक्षा पास झाले आहे. ज्यावेळी बिंदूचा मुलगा दहावीत होता, त्यावेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मुलाला त्या प्रेरणा देत होत्या, मात्र आता 9 वर्षानंतर आई आणि मुलगा एकाचवेळी सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला बसले आणि पासही झाले आहेत.
मायलेकरं दोघंही परीक्षेत पास
गेल्या 10 वर्षापासून बिंदू या अंगणवाडीच्या केंद्रात काम करतात, मायलेकारांनी दोघंही परीक्षेत पास झाली असली तरी बिंदूचा मुलगा सांगतो की, आम्ही दोघांनी कधीच एकत्र अभ्यास केला नाही, मात्र अभ्यासाबाबत आम्ही नेहमीच एकमेकांशी चर्चा करत राहिलो. बिंदूचा मुलगा म्हणतो मला एकांतात आणि एकटाच अभ्यास करायला आवडतं, तर आईला कधी तरी वेळ मिळायचा, अंगणवाडी, घरातील कामं करुन वेळ मिळेल तेव्हा ती अभ्यास करायची, मात्र अभ्यासातील सातत्य तिने कधी कमी पडू दिलं नाही असंही तो सांगतो.
राज्यात आई आणि मुलाची चर्चा
आई आणि मुलाच्या या यशामुळे बिंदू आणि त्यांचा मुलगा विवेक हा केरळमध्ये चर्चेचा विषय झाले आहेत, फक्त ती चर्चाच नाही तर त्यांच्या या यशाचे कौतुकही होत आहे. बिंदू स्वतः सांगतात की, सरकारी नोकरीसाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. ही परीक्षा आहे म्हणून मी चोवीस तास अभ्यासच करत बसले नाही तर त्या अभ्यासात सातत्य ठेवले, मात्र परीक्षेला सहा महिने असताना मात्र परीक्षेची जय्यत तयारी केली असंही त्या सांगतात.
आता दोघंही एकाच वेळी सरकारी नोकरीत
बिंदू आता सांगतात की, आपण आता कनिष्ठ वर्गातील लिपिक पदासाठी मी काम करणार तर माझा मुलगाही लिपिक म्हणूनच आपल्या नोकरीची सुरुवात करेल. केरळ स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बिंदूला 92 वा क्रमांक मिळाला आहे तर त्यांच्या विवेकला 38 वा क्रमांक मिळाला आहे.