5G in India : देशातील 50 शहरात 5G चा गिअर पडला, राज्यातील या तीनच शहरात सेवा, पण इतकी गावे इंटरनेटच्या रेंज बाहेर..

5G in India : राज्यातील या शहरात 5G चा गिअर पडला आहे..

5G in India : देशातील 50 शहरात 5G चा गिअर पडला, राज्यातील या तीनच शहरात सेवा, पण इतकी गावे इंटरनेटच्या रेंज बाहेर..
याच शहरात सेवाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 10:28 PM

नवी दिल्ली : भारतात 1 ऑक्टोबर 2022 रोजी 5G नेटवर्कचा (5G Network) श्रीगणेशा झाला. ही सेवा आता देशातील प्रमुख शहरात (Major Cities) उपलब्ध झाली आहे. 5G नेटवर्कचा सर्वात जास्त विस्तार गुजरात (Gujrat) राज्यात झाला आहे. या राज्यातील जवळपास 33 जिल्ह्यांमध्ये हा सेवा मिळत आहे. इतर राज्य त्यामानाने मागे आहेत. महाराष्ट्रातील तर अवघ्या तीनच शहरात 5G नेटवर्कची सेवा मिळत आहे. येत्या काही दिवसात टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) लवकरच त्यांचं जाळ विस्तारतील अशी आशा आहे.

राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरातच 5G नेटवर्कचे उद्धघाटन झाले आहे. या शहराच्या परिघाबाहेर उर्वरीत राज्यात 5G नेटवर्क नाही. तर गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर, भावनगर, मेहसाणा, राजकोट, सूरत, वडोदरा, अमरेली, बोटाद, जूनागढ, पोरबंदर, वेरावल, आनंद, भरुच, पालनपूर, नवसारी अशा एकूण 33 जिल्ह्यात ही सेवा उपलब्ध आहे.

बुधवारी दूरसंचार राज्य मंत्री देवुसिंह चौहान (Devusinh Chauhan) यांनी संसदेत याविषयीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुंबई, चेन्नई, बेंगळुरु या सारख्या शहरात 5G नेटवर्कची सुरुवात झाली आहे. सध्या देशातील 14 राज्ये आणि केंद्री शासित प्रदेशात 5G सेवा सुरु करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

उत्तर भारतातील राज्यातील एखाद-दोन शहर वगळता ही सेवा अद्याप कुठेच पोहचलेली नाही. त्यामुळे एकट्या गुजरात राज्यातच 5G नेटवर्कचा कसा विस्तार झाला हे मोठं कोड आहे. त्यासाठी त्या राज्याने काय पायाभूत सुविधा पुरविल्या हा संशोधनाचा विषय आहे.

दूरसंचार ऑपरेटर्सने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2022 पर्यंत देशातील 6,44,131 गावांतील जवळपास 6,05,230 गावांमध्ये मोबाईलची कनेक्टिविटी आहे. तर 38,901 गावांच्या हद्दीत अद्याप इंटरनेटचे नेटवर्क पोहचलेले नाही.

आदिवासी विभागात अद्यापही मोबाईल नेटवर्क अथवा इंटरनेट पोहचलेले नाही. 25 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या 1,20,613 गावांतील जवळपास 1,00,030 गावात मोबाईल नेटवर्क आहे. तर 20,583 गावांमध्ये नेटवर्कची रेंज नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.