5G Network: जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल आणि टाटा एकत्र

5G Network | काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओकडून मुंबई आणि पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये 5 जी नेटवर्कच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

5G Network: जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल आणि टाटा एकत्र
5 जी नेटवर्क
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 10:03 AM

मुंबई: देशात येऊ घातलेल्या 5 जी नेटवर्कसाठी बड्या कंपन्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ सर्वात आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओकडून मुंबई आणि पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये 5 जी नेटवर्कच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता भारती एअरटेल व टाटा समूहाने इंटेलबरोबर व्यावसायिक सहकार्य करत 5जी मोबाईल तंत्रज्ञानासाठी योजना आखली आहे.

भारती एअरटेलने 5 जी तंत्रज्ञानासाठी इंटेलचे तंत्र व्यासपीठ वापरण्याची योजना बुधवारी जाहीर केली. खुल्या ध्वनिलहरीचे जाळे (ओ-रॅन) त्यासाठी उपयोगात आणले जाणार आहे. भारती एअरटेलने यासाठी इंटेलबरोबर कामही सुरू केले असून काही शहरांमध्ये त्याची चाचणी घेण्यात येत आहे.

इंटेलच्या ‘ओ-रॅन’ मंचावर टाटा समूहही दाखल होऊ पाहात आहे. जपानच्या डोकोमोच्या साहाय्याने यापूर्वी दूरसंचार क्षेत्रात असलेल्या टाटाने ‘5 जी’साठी इंटेल तसेच एअरटेलबरोबर जाण्याचे निश्चित केले आहे. तंत्रज्ञानासाठी टाटा समूहातील टीसीएस ही कंपनी पुढाकार घेत आहे.

देशातील ग्रामीण भागातही 5G ट्रायल्स

काही दिवसांपूर्वीच दूरसंचार विभागाने व्ही (VI), एअरटेल (Airtel) आणि रिलायन्स जिओसह (Reliance Jio) दूरसंचार ऑपरेटर्सना ग्रामीण भागात 5 जी (5G) तंत्रज्ञानाची चाचणी करण्यास सांगितले होते. दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना शहरी भागात 5 जी अ‍ॅप्लिकेशन्सच्या चाचणीसह ग्रामीण भागातही या चाचण्या करण्यास सांगितले आहे. एमटीएनएलने दिल्लीत 5 जी च्या चाचण्यांसाठी सी-डॉटसोबत काम सुरु केलं आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ते नजफगडजवळ 5 जी टेस्ट करणार आहेत. कंपनीने शुल्क जमा केल्यानंतर त्यांना ट्रायल स्पेक्ट्रम दिलं जाईल.

दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, हैदराबादसह विविध ठिकाणी 5G च्या चाचण्या घेण्यात येतील. या संदर्भात टेलिकॉम कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, टेलिकॉम ऑपरेटरला 700 मेगाहर्ट्झ बँड, 3.3-3-6 गीगाहर्ट्झ (GHz) बँड आणि 24.25-28.5 GHz बँडमधील विविध ठिकाणी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले आहे.

10 पट डाउनलोड स्पीड मिळणार

दूरसंचार मंत्रालयाच्या मते, ग्राहकांना 4G च्या तुलनेत 5G तंत्रज्ञानाद्वारे दहापट चांगले डाउनलोड स्पीड आणि तीनपट स्पेक्ट्रम कार्यक्षमता मिळेल. परीक्षणादरम्यान, भारतीय सेटिंगमध्ये 5 जी ची चाचणी केली जाईल. यामध्ये टेली-मेडिसिन, टेली-एज्युकेशन आणि ड्रोन-आधारित कृषी देखरेख आदींचा समावेश असेल. याद्वारे टेलिकॉम ऑपरेटर त्यांच्या नेटवर्कवर विविध 5G उपकरणांची सहज चाचणी घेण्यास सक्षम असतील.

शहरांसह ग्रामीण भारतातही 5G च्या चाचण्या

सध्या चाचणीचा कालावधी 6 महिने असेल. त्यापैकी उपकरणे खरेदी आणि स्थापनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी असेल. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक ऑपरेटरला शहरी सेटिंगव्यतिरिक्त ग्रामीण आणि अर्ध-शहरी सेटिंग्जमध्येही चाचणी घ्यावी लागेल, जेणेकरून 5 जी तंत्रज्ञानाचा फायदा देशभरातील नागरिकांना मिळेल. ही सेवा केवळ शहरी भागात मर्यादित नसावी. तथापि, आणखी एक उद्योग स्त्रोत असा दावा करतो की, कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरला पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये स्पेक्ट्रम वाटप करण्यात आलेले नाही.

संबंधित बातम्या:

जियोच्या या फोनसह वर्षभर मिळवा फ्री डेटा, फ्री कॉलिंग आणि फ्री एसएमएस

मुंबईत एअरटेल 5 जी ट्रायल नेटवर्क लाईव्ह; आधीपेक्षा अधिक डाउनलोड स्पीड मिळवण्यात यश

Airtel Black | एअरलेटची ग्राहकांसाठी खास सुविधा, मोबाईल, DTH, Fibre सारख्या सर्व सेवांसाठी एकच बिल

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...