7th Pay commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या महिन्यात होणार चांदी

7th Pay commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचा महागाई भत्ता वाढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एवढंच नाहीतर पुढील वर्षात 2023 मध्ये त्यांच्यासाठी खास गिफ्ट ही मिळणार आहे.

7th Pay commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या महिन्यात होणार चांदी
डबल गुड न्यूजImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 9:58 AM

7th Pay commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Employees) आनंदाची बातमी आहे. एवढंच नाही तर पुढील वर्ष, 2023 साठी केंद्र सरकार त्यांना सरप्राईज ‘गिफ्ट’ ही देणार आहे. जुलै 2022 पासून केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्याचा निर्णय होणार आहे. श्रम मंत्रालयाने यापूर्वीच भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाचे (All India Consumer Price Index- Industrial workers (AICPI)) आकडे जाहीर केले आहेत.

कर्मचाऱ्यांना होणार फायदा

भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकात वाढ झाल्याने पुढील वर्षातही महागाई भत्त्यात वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. जूनपेक्षा जुलाई 2022 AICPI निर्देशांकात 0.7 अंकांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

2023 मध्ये DA वाढणार

AICPI निर्देशांकाच्या आकडेवारी नजर टाकल्यास, जून महिन्यात निर्देशांक 129.2 होता, तर तो जुलै महिन्यात वाढल आहे. त्यामुळे जानेवारी 2023 मधील महागाई भत्त्यात (Dearness allowance) वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

5 महिने वाट पहा

निर्देशांकात वाढ झाल्याने महागाई भत्त्यात वाढ होणार हे निश्चित आहे. पण ही वाढ किती होईल, यासाठी कर्मचाऱ्यांना पाच महिने वाट पहावी लागणार आहे. जुलै पासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत AICPI निर्देशांकाच्या आकड्यावर हा खेळ अवलंबून असेल. त्याआधारे जानेवारी 2023 मधील महागाई भत्ता (Dearness allowance) ठरेल.

श्रम मंत्रालयाकडून आकडा

AICPI निर्देशांकाचे आकडे कामगार आणि श्रम मंत्रालय (Labour Ministry) जाहीर करते. निर्देशांक 88 केंद्र आणि संपूर्ण देशासाठी तयार करण्यात येतो. AICPI निर्देशांक हा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी जाहीर करण्यात येतो.

आकडा एक महिन्यापूर्वीचा

AICPI निर्देशांकाचा आकडा एक महिन्यापूर्वीचा असतो. जुलै महिन्यातील आकडा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी जाहीर करण्यात येतो. तर ऑगस्ट महिन्याचा आकडा हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जाहीर करण्यात येतो.

कर्मचाऱ्यांना देवी पावणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मिळणार हे निश्चित आहे. अद्याप अधिकृत आकडेवारी आली नाही. या नवरात्रीत याविषयीचा निर्णय होऊ शकतो. 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळू शकते.

जुलै महिन्याचा महागाई भत्ता थकीत

जानेवारीपासून जून महिन्यापर्यंतच्या आकड्यांवरुन जुलै 2022 मधील महागाई भत्ता जाहीर करण्यात आलेला नाही. यामध्ये 4 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. दोन महिन्यांपासून कर्मचारी या महागाई भत्त्याच्या प्रतिक्षेत आहेत.

शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला.
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर.
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस.
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?.
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'.