Today Gold- Silver Price : सोन्याच्या दरात किंचित वाढ, चांदीचे दर घसरले; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

आज सोन्याच्या दरात किंचित वाढ पहायला मिळत आहे, तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे 500 रुपयांची घसरण झाली आहे. जाणून घेऊयात आजचे सोन्या-चांदीचे दर

Today Gold- Silver Price : सोन्याच्या दरात किंचित वाढ, चांदीचे दर घसरले; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
सोन्या, चांदीचे आजचे दर
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 2:54 PM

मुंबई : जसजशी अक्षय तृतीया जवळ येत आहे, तसतशी सोन्या-चांदीच्या भावात (Today Gold- Silver Price) घसरण पहायला मिळत आहे. अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा सोने (Gold) स्वस्त झाल्याने अक्षय तृतीयेला मोठ्याप्रमाणात सोन्याच्या खरेदीचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या काही आठवड्यापासून सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने सोन्यामधील गुंतवणुकीसाठी हा काळ सर्वाधिक योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आज शुक्रवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजार रुपये इतके होते. आज सोन्याच्या दरात किंचत वाढ झाली असून, 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48550 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणेजच आज सोन्यामध्ये प्रति तोळा 550 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52 हजार 970 रुपये इतके आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. चांदीचे दर शुक्रवारच्या तुलनेत आज किलोमागे 500 रुपयांनी घसरले असून, आजचा चांदीचा (Silver) दर 63500 रुपये इतका झाला आहे. सोन्याचे दर हे सोनं अधिक दागिन्यांच्या घडणावळीचा दर असा ठरवला जात असल्याने अनेक ठिकाणी त्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात तफावत आढळून येते.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव

  1. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज राज्याची राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48560 एवढा असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52 हजार 970 रुपये आहे.
  2. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 420 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार 20 रुपये आहे.
  3. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 620 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार 20 रुपये इतका आहे.
  4. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 590 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार रुपये आहे.
  5. दुसरीकडे शुक्रवारच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 63500 रुपयांवर पोहोचले आहेत.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.