आधार कार्डमध्ये जन्मतारीख कशी अपडेट करायची? जाणून घ्या सोपी पद्धत

सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. पण अनेकदा त्यातील चुकीच्या माहितीमुळे तुमची काम रखडतात. (Aadhaar Card Date of birth update online know stepwise process)

आधार कार्डमध्ये जन्मतारीख कशी अपडेट करायची? जाणून घ्या सोपी पद्धत
आधार कार्ड
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 11:06 AM

मुंबई : सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. पण अनेकदा त्यातील चुकीच्या माहितीमुळे तुमची काम रखडतात. अशावेळी तुम्ही ती माहिती अपडेट करणे फार गरजेचे असते. आधार कार्ड जारी करणारे UIDAI सर्वसामान्य लोकांना आधार अपडेट करण्याची सुविधा पुरवते. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आधारकार्ड अपडेट करु शकता. (Aadhaar Card Date of birth update online know stepwise process)

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आधार कार्डात बरीच माहिती अपडेट करता येऊ शकते. यासाठी ऑनलाईन सुविधा दिली जात असून तुम्ही घरबसल्या हे काम करु शकता. आज आम्ही तुम्हाला आधारकार्डमध्ये जन्मतारीख बदल करण्याबद्दलची माहिती देणार आहोत. तसेच हे नेमकं कसं करायचे याच्या काही टीप्सही देणार आहोत जेणेकरुन तुमचे काम सहज होईल.

आधार कार्डमधील जन्मतारीख ऑनलाईनच्या माध्यमातून कशाप्रकारे अपडेट केली जाऊ शकते, याची माहिती भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीने (UIDAI) ने ट्वीट करत दिली आहे. यूआयडीएआयने केलेल्या ट्वीटनुसार, ‘आता तुम्ही https://ssup.uidai.gov.in/ssup/ या लिंकवर क्लिक करुन आधार कार्डमध्ये जन्मतारीख अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला स्कॅन केलेली मूळ कागदपत्रे अपलोड करावी लागतील. आधार अपडेट करण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत याची यादीही त्यांनी इथे दिली आहे.

?आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक?

आधार कार्डमध्ये जन्मतारीख अपडेट करण्यासाठी आधारने दिलेल्या कागदपत्रांच्या यादीनुसार, तुम्हाला पासपोर्ट, पॅनकार्ड, रेशनकार्ड, पीडीएस फोटो कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादींची आवश्यकता आहे. UIDAI च्या यादीत एकूण 32 ओळखपत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात तुमचे नाव आणि फोटो असणे अनिवार्य आहे.

?आधार कार्डमध्ये जन्मतारीख कशी अपडेट कराल?

?आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला ssup.uidai.gov.in/ssup/ या लिंकवर क्लिक करु शकता.

?यात अपडेट करण्यापूर्वी तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक द्यावा लागेल. यानंतर captcha किंवा वेरिफिकेशन कार्ड भरावे लागेल.

?यानंतर ‘Send OTP’ वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठविला जाईल. हा ओटीपीसाठी दिलेल्या जागी भरा आणि submit बटणावर क्लिक करा.

?यामुळे तुमचे लॉगिन पूर्ण होईल. यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर आधार कार्डची संपूर्ण तपशिलवार माहिती दिसेल.

?यात तुम्हाला जन्मतारीख अपडेट करण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

?तो अपडेट केल्यावर त्याला आवश्यक असणारी स्कॅन केलेली कागदपत्र जोडून ती अपलोड करा.

?यानंतर Submit बटणावर क्लिक करा. यानुसार तुमचे आधार कार्ड अपडेट करण्याचे काम पूर्ण होईल. याबाबतचा एक मेसेजही तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल.

?ऑनलाईद्वारे कोणती माहिती अपडेट करणं शक्य?

आपण आपले नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि आधार कार्डमध्ये भाषा ऑनलाईन मोडद्वारे अपडेट करू शकता. अन्य अपडेटसाठी तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्र किंवा नावनोंदणी / अपडेट केंद्राला भेट द्यावी लागेल.

?किती वेळा अपडेट करता येते आधार कार्ड?

आधार कार्डमध्ये तुम्हाला नावात दोन वेळा, जन्मतारखेत एकदा, लिंगाची माहिती एकदा अपडेट करता येते. (Aadhaar Card Date of birth update online know stepwise process)

संबंधित बातम्या : 

घर भाड्यानं दिलं असेल तर करात सूट, काय नियम आहेत? कसा फायदा होणार?

Post Office Scheme : दररोज 95 रुपये वाचवून 14 लाख मिळवा, ‘या’ फायद्यांसाठी गुंतवणुकीच्या टीप्स

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.