Aadhaar Card : आधारला मोबाईल नंबर लिंक करण्याचा त्रास संपला, टेन्शन घेऊ नका, फक्त हे करा…
आधार कार्डशी संबंधित कोणताही व्यवहार असला की आपल्याला ओटीपी येतो. त्यासाठी आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असतं.
मुंबई : सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक झालंय. कुठेही गेलं की तुमचं आधार कार्ड द्या म्हणतात. बँक (Bank), शासकीय कार्यालयं असो वा कुठेही. त्यातही तुमच्या नावात थोडाही बदल असला की ते बदलण्याची डोकेदुखी असतेच. आधार कार्डला अनेकदा पॅन (PAN) कार्ड लिंक नसल्यासंही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी पुन्हा वेगळी माहिती देऊन ते अपडेट करावं लागतं. या सगळ्यात मोबाईल नंबर (mobile number) आधार कार्डसोबत लिंक असण्याची प्राथमिकता असते. कारण, आधार कार्डशी संबंधित कोणताही व्यवहार असला की आपल्याला ओटीपी येतो. त्यासाठी आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असतं. त्याआधी आधार कार्ड कसं मिळवता येईल? यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. हे फॉलो केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड सहज मिळेल.
नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशिवाय आधार कसा मिळवायचा-
लक्षात ठेवा की नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाशिवाय तुम्ही आधार ऑनलाइन मिळवू शकत नाही. खाली दिलेल्या पायऱ्यांचं नुसरण करून तुम्ही मोबाईल नंबरशिवाय आधार मिळवू शकता.
- तुमच्या आधार क्रमांकासह जवळच्या आधार केंद्राला भेट द्या
- आता आवश्यक बायो-मेट्रिक तपशील पडताळणी करा जसे की थंब व्हेरिफिकेशन आणि रेटिना स्कॅन इ.
- तुमच्यासोबत पॅन आणि ओळखपत्र सारखे इतर ओळखीचे पुरावे सोबत ठेवा
- प्रक्रियेनंतर, केंद्रातील संबंधित व्यक्तीकडून तुम्हाला तुमच्या आधारची प्रिंट आऊट दिली जाईल. सामान्य कागदाच्या स्वरूपात तयार केलेल्या आधारसाठी 50 रुपये आणि पीव्हीसी आवृत्तीसाठी 100 रुपये द्यावे लागतील.
आधार कार्डसाठी नावनोंदणी
आधार केंद्र किंवा बँक/पोस्ट ऑफिसला भेट देऊन कोणतीही व्यक्ती आधार कार्डसाठी नावनोंदणी करू शकते. यानंतर तो UIDAI द्वारे जारी केलेल्या एनरोलमेंट आयडी, व्हर्च्युअल आयडीद्वारे त्याचे आधार कार्ड प्रिंट करू शकतो. आधार क्रमांक दिल्यावर तुम्ही त्याचे आधार कार्ड वेगवेगळ्या प्रकारे डाउनलोड किंवा प्रिंट करू शकतात. या आधार कार्डचा वापर कोणत्याही सरकारी योजनेसाठी करता येतो.
आधार कार्ड का गरजेचं?
आधार कार्ड आवश्यक झालंय. कुठेही गेलं की तुमचं आधार कार्ड द्या म्हणतात. बँक, शासकीय कार्यालयं असो वा कुठेही. त्यातही तुमच्या नावात थोडाही बदल असला की ते बदलण्याची डोकेदुखी असतेच. आधार कार्डला अनेकदा पॅन कार्ड लिंक नसल्यासंही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी पुन्हा वेगळी माहिती देऊन ते अपडेट करावं लागतं. या सगळ्यात मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक असण्याची प्राथमिकता असते. म्हणून वरील दिलेल्या पायऱ्या वापरा आणि भविष्यातील अडचणी दूर करा.